Donald Trump : ट्रम्प यांनी कॅरेबियन समुद्रात 3 युद्धनौका पाठवल्या; अमेरिकेत ड्रग्ज कार्टेल चालवल्याचा व्हेनेझुएलावर आरोप

Donald Trump

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन डीसी : Donald Trump व्हेनेझुएला आणि अमेरिकेदरम्यान नवी आघाडी उघडली आहे. ७ ऑगस्टला ट्रम्प सरकारने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरोंवर ड्रग्ज कार्टेल चालवल्याचा आरोप लावत सुमारे ४१७ कोटी रुपयांचे बक्षीस जारी केले होते. आता स्थिती आणखी बिघडली आहे, जेव्हा अमेरिकेने कॅरेबियन समुद्रात ३ युद्धनौका उतरवल्या आहेत. हे गायडेड क्षेपणास्त्र विनाशक आहे. त्यात ४५०० नाविक आणि २,२०० मरीनचा समावेश आहे. एक पाणबुडीही तैनात केली जात आहे.Donald Trump

राष्ट्राध्यक्ष मादुरोंनी आरोप लावला की, ट्रम्प त्यांचे सरकार पाडण्याचा बेकायदा आणि गुन्ह्याचा प्रयत्न करत आहेत. मादुरो यांनी लोकांना आवाहन केले की, त्यांनी बोलिव्हेरियन लष्करात सहभागी व्हावे आणि अमेरिकेला संभाव्य हल्ल्याचा सामाना करण्यास तयार राहावे.व्हेनेझुएलाची राजधानी काराकासच्या रस्त्यांवर लांब रांगते उभे राहून भरती केंद्रांवर पोहोचलो. यात सरकारी कर्मचारी, गृहिणी आणि ज्येष्ठांचाही समावेश आहे. मादुरोंनी दावा केला की, ४५ लाख लोक लष्करात दाखल होण्यासाठी तयार आहेत.Donald Trump



समेटाचेही प्रयत्न… ८ विरोधी नेत्यांना तुरुंगातून सोडले, ५ घरात नजरकैद

व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष मादुरो यांनी तयारीसोबत अमेरिकेशी समेटाची शक्यता आहे. याअंतर्गत सोमवारी अनेक राजकीय कैद्यांची सुटका कली आहे. माजी गव्हर्नर आणि राष्ट्रपतिपदाचे उमेदवार हेन्रीक कॅप्रिलेस म्हणाले, ८ कैद्यांची रविवारी पहाटे सुटका केली तर अन्य ५ जणांची शिक्षा घरात नजरकैदेअंतर्गत पूर्ण करावी लागेल. सुटका केलेले विरोधी नेत मारिया कोरीना मचाडोंचे सहकारी अमेरिको डी ग्राजिया यांचा समावेश आहे. मानवी हक्क गट फोरो पेनालनुसार, २१ ऑगस्टपर्यंत व्हेनेझुएलात ८१५ राजकीय कैदी होते. ट्रम्प प्रशासनाने मादुरांवर दबाव वाढवत मादक पदार्थ कार्टेलशी संबंधित आरोपादरम्यान बक्षीस ५० दशलक्ष डॉलर केले तेव्हा हे घडत आहे.

राष्ट्रपती भवनात लष्कर भरती केंद्र, नारा- ‘शावेज अमर आहेत’

काराकासच्या सार्वजनिक इमारती, लष्करी तळ आणि राष्ट्रपती भवनात सैन्य भरती केंद्र उघडली आहेत. मोठ्या प्रमाणात ह्युगो शावेजच्या माउंटेन बॅरकपर्यंत पोहोच आणि नोंदणी केली.
भरती केंद्रांवर ‘शावेज अमर आहेत’चे पोस्टर लावले आहेत. भरतीसाठी नोंदणीनंतर प्रत्येक उमेदवार घोषणा देतो- मी व्हेनेझुएलासाठी स्वाक्षरी करतो,मातृभूमी अमर आहे. भरतीदरम्यान नव्या स्वयंसेकांना माहितीपट दाखवला. त्यात व्हेनेझुएलावर १९०२-०३ च्या युरोपीय नौदला नाकेबंदीचा उल्लेख केला होता.
भरतीसाठी गेलेल्या लोकांना शस्त्रांचे प्रदर्शन केले, त्यात अमेरिकी मशीन गन, स्वीडिश ग्रेनेड लाँचर सोव्हियत आरपीजी आणि बेल्जियमची मशीन गन ठेवली. सैन्य अधिकाऱ्यांनी पायाभूत प्रशिक्षण देताना सांगितले की, या शस्त्रांचा वापर कसा केला जातो.

Trump Sends Warships to Caribbean Sea; Accuses Venezuela of Drug Cartel

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात