विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : Ajit Pawar मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील नगरविकास खात्यावर नाराज असल्याचा दावा केला जात आहे. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी हा दावा जोरकसपणे फेटाळून लावला आहे. मुख्यमंत्री नगरविकास खात्यावर नाराज असल्याची माहिती धांदात खोटी आहे, असे ते म्हणाले.Ajit Pawar
केंद्र सरकारच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात नगरविकास खाते अपयशी ठरल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचा दावा केला जात आहे. पत्रकारांनी हा मुद्दा कोल्हापूरच्या दौऱ्यावर असणाऱ्या अजित पवारांपुढे उपस्थित केला. त्यावर अजित पवारांनी मुख्यमंत्री नगरविकास खात्यावर नाराज असल्याची तुम्हाला मिळालेली माहिती धादांत खोटी आहे, असे सांगितले. तसेच यासंबंधीच्या सर्वच प्रतिक्रिया जोरकसपणे फेटाळून लावल्या.Ajit Pawar
तसेच १४४५ कोटी रुपयांचा अंबाबाई मंदिर पुनर्विकास प्रकल्प पुढे सरकण्याची अजित पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आम्हाला फटका बसला. आमच्या महायुतीच्या जागा कमी निवडून आल्या. त्यानंतर आम्ही आमच्या कामात सुधारणा केली. जनताभिमुख कामे केली. लोकांचा विश्वास जिंकला. यामुळे विधानसभा निवडणुकीत आमच्या तीनही पक्षांना महायुतीला २३८ जागा मिळाल्या. यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्यांनी महायुतीच्या आणि मतांच्या विषयावर समाजामध्ये गैरसमज पसरविण्याचे काम सुरू केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App