आगमना आधीच गणरायाची कृपादृष्टी; सरकारी नोकरदार‌ + एसटी कर्मचाऱ्यांचा आज 26 ऑगस्टलाच पगार; फडणवीस सरकारचा निर्णय

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्य सरकारी कर्मचारी आणि एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा पगार गणेशोत्सवापूर्वी होणार आहे. राज्य शासनाच्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटीच्या सुमारे 83000 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन गणेश उत्सवापूर्वी देण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून, लवकरच एसटीच्या सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बँक खात्यांवर त्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन जमा होईल.

महाराष्ट्रातल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांवर आणि एसटी कर्मचाऱ्यांवर श्री गणरायाने आगमना आधीच कृपा केलीय. राज्यातील शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच निवृत्ती वेतन धारकांना फडणवीस सरकारने खुशखबर दिली. गणेशोत्सव सणाचा उत्साह आणि धूम लक्षात घेता ऑगस्ट महिन्याचा पगार 5 दिवस आधीच बँक खात्यात जमा केला जाणार आहे. ऐन गणेशोत्सवाच्या काळात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन 26 ऑगस्ट रोजीच देण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला. 27 ऑगस्टला गणेश चतुर्थी आहे. त्याच्या आदल्या दिवशीच पगार हाती मिळणार असल्याने सरकारी नोकरदारांचा गणेशोत्सावाचा आनंद द्विगुणीत झाला आहे.



राज्य सरकारकडून शासन निर्णय काढून 1 सप्टेंबर रोजी होणारे कर्मचारी आणि अधिकार्यांचे वेतन 26 ऑगस्ट रोजी देण्यास सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त आणि अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, अकृषि विद्यापीठे/ कृषी विद्यापीठे आणि त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालयांचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच निवृत वेतनधारकांना / कुटुंब निवृत वेतन धारक यांनाही हा निर्णय लागू राहणार आहे. त्यामुळे, या सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला तब्बल 5 दिवस आधीच आपला पगार मिळणार आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळाती खर्चासाठी खिसा गरम आणि हात ढिला होणार आहे.

गणेशोत्सवात 5 दिवस 12.00 वाजेपर्यंत परवानगी

आगामी गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांनी गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सव काळात गणेश मंडळांना रात्री 12.00 वाजेपर्यंत देखावे दाखवण्यासाठी शेवटचे 5 दिवस दिले जाणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी कराड येथे दिली. याबाबतचा आदेश लवकरच मुख्यमंत्री जाहीर करणार आहेत, असेही ते म्हणाले.

कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी

यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील टोल नाक्यांवर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना आणि एसटी बसेसना टोलमाफी मिळणार आहे. त्यासाठी “गणेशोत्सव 2025 – कोकण दर्शन” या नावाचे विशेष टोलमाफी पास देण्यात येणार असून त्यावर वाहन क्रमांक आणि वाहन मालकाची माहिती नोंदवली जाईल.

Government employees + ST employees will get their salaries on August 26th; Fadnavis government’s decision

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात