विशेष प्रतिनिधी
मुंबई : Aditya Thackeray त्यांच्या खिशातील खड्डे भरले, पण रस्त्यांवरील नाही, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे मुंबईतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. गेल्या दोन वर्षांत एकनाथ शिंदे यांनी मुंबई आणि महाराष्ट्राला ज्या प्रकारे लुटले आहे, ते सर्वांसमोर आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. त्यांनी आरोप केला की, “पहिल्या वर्षी ६०८० कोटींचा घोटाळा आणि दुसऱ्या वर्षी ६००० कोटींचा घोटाळा त्यांनी केला आहे.”Aditya Thackeray
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, “मी जे म्हणत होतो ते आज तुम्हाला दिसत आहे. संपूर्ण मुंबईत खड्ड्यांचे राज्य सुरू आहे. त्यांच्या खिशातील खड्डे भरले, पण रस्त्यांवरील खड्डे भरले नाहीत. संपूर्ण महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग असो किंवा राज्य महामार्ग असो, सर्व रस्त्यांची अवस्था वाईट आहे. आमची अवस्था खराब होत आहे, ते मात्र आनंदी आहेत आणि त्यांच्या मस्तीत मग्न आहेत.” निवडणूक आयोगावर लावलेल्या ‘मत चोरी’च्या आरोपांवरही आदित्य ठाकरेंनी भाष्य केले. ते म्हणाले की, “हा फक्त विरोधकांचा मुद्दा नाही, तर सर्वसामान्यांचा मुद्दा आहे. जर मतांची चोरी होत असेल, तर तुमच्या मताला काहीच अर्थ नाही. तुम्ही कोणत्याही विचारधारेचे असा, मत चोरीचा मुद्दा प्रत्येकाला प्रभावित करत आहे आणि सर्वांचे नुकसान करत आहे.”
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App