वृत्तसंस्था
नवी दिल्ली : S. Jaishankar व्यापार कराराबाबत अमेरिकेशी चर्चा सुरू आहे, परंतु भारत कोणत्याही परिस्थितीत आपल्या शेतकरी आणि लहान उत्पादकांच्या हितांशी तडजोड करणार नाही,असे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ठणकावून सांगितले. ते म्हणाले, या करारातील काही मुद्द्यांवर भारताची ‘लाल रेषा’ निश्चित आहे. या लाल रेषा प्रामुख्याने आपल्या शेतकऱ्यांच्या आणि काही प्रमाणात लहान उत्पादकांच्या हितांशी संबंधित आहेत आणि सरकार या हितांचे रक्षण करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे.S. Jaishankar
परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी इकॉनॉमिक टाईम्स वर्ल्ड लीडर्स फोरममध्ये हे सांगितले. अलिकडेच ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवरील शुल्क दुप्पट करून ५०% केले तेव्हा भारत आणि अमेरिकेतील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. यामध्ये रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्यावर अतिरिक्त २५% शुल्क देखील समाविष्ट आहे.S. Jaishankar
जयशंकर यांनी ट्रम्प प्रशासनाचे आरोप देखील फेटाळून लावले.जर तुम्हाला भारतातून तेल किंवा रिफाइंड उत्पादने खरेदी करण्यात अडचण येत असेल, तर खरेदी करू नका. कोणीही तुम्हाला सक्ती करत नाही. पण युरोप खरेदी करतो, अमेरिका देखील खरेदी करते. जर तुम्हाला ते आवडत नसेल, तर ते खरेदी करू नका.’
असा अमेरिकी अध्यक्ष याआधी पाहिला नाही
जयशंकर म्हणाले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची जगाशी वागण्याची पद्धत पारंपारिक राजनैतिकतेपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे आणि संपूर्ण जग या बदलाचा सामना करत आहे. ते म्हणाले, ‘आम्ही यापूर्वी कधीही असा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पाहिला नाही जो इतक्या सार्वजनिकरित्या परराष्ट्र धोरण चालवतो. हा बदल केवळ भारतापुरता मर्यादित नाही.’
चीनशी संबंधांवर: जयशंकर यांनी स्पष्ट केले की अमेरिकेशी संबंधांमधील तणावाचा अर्थ असा नाही की भारत-चीन संबंध सुधारत आहेत. ‘प्रत्येक परिस्थितीचे स्वतंत्रपणे विश्लेषण हवे.सर्व एकत्र करून समान निष्कर्ष काढणे चुकीचे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App