Supriya Sule : सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य- माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेले चालते:तुम्हाला काय प्रॉब्लेम?

Supriya Sule

विशेष प्रतिनिधी

नाशिक : Supriya Sule  मी मटण खाल्लेले माझ्या पांडुरंगाला चालते, तर तुम्हाला काय अडचण? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना केला आहे. आम्ही आमच्या पैशांनी खातो. आपण कुणाला मिंधे नाहीत, असेही त्यांनी म्हटले. तसेच, त्यांनी महायुती सरकारवरही अनेक मुद्द्यांवरून टीका केली. त्या दिंडोरी येथे महात्मा फुलेंच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात बोलत होत्या.Supriya Sule

दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे महात्मा फुलेंच्या पुतळ्याचे अनावरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला मंत्री नरहरी झिरवळ आणि सुप्रिया सुळे यांनी उपस्थिती लावली होती. कार्यक्रमात भाषण दरम्यान मंत्री नरहरी झिरवळ यांच्यां समोरच सुप्रिया सुळे यांची सरकारवर सडकून टीका केली.Supriya Sule



नेमके काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

मी रामकृष्ण हरी वाली आहे. फक्त माळ घालत नाही. कारण कधी कधी मटण खाते, खरे बोलते. मी काही त्यांच्यासारखे खोटे बोलत नाही. माझ्या पांडुरंगाला चालते, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना केला. आमचे आई-वडील खातात, सासू-सासरे खातात, नवरा खातो, असेही त्या म्हणाल्या. आम्ही आमच्या पैशांनी खातो. दुसऱ्यांचे आपल्याकडे उधार नाही. आपण कुणाला मिंधे नाहीत.

एकदा कुठेतरी जेवायला गेले असता, तिथे मटण खाल्ले होते. तेवढेच व्हायरल केले. खाल्ले तर काही पाप केले का? खायचा मोह होतो म्हणून अजून माळ घातली नाही. जे करायचे डंके की चोट पे, दिल खोल के करो, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

मुख्यमंत्री आम्हाला वेळ देत नाहीत

सुप्रिया सुळे यांनी यावेळी सरकारच्या कारभारावर टीका केली. “मुख्यमंत्री तर मला वेळच देत नाही, असा आरोप सुळे यांनी केला. मुख्यमंत्री वेळ देत नसल्याने मी मागणेच बंद केले आहे. दहा वेळा आपण वेळ मागतो, पण वेळ देत नाहीत. याचा अर्थ काय, त्यांना वेळ द्यायचा नाही. म्हणून आम्ही थेट दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतो. मी ठरवले आहे, इथे काम करत नाही ना, माझी कामे दिल्लीत होतात” असे सांगत त्यांनी अमित शहा यांचे जाहीर आभारही मानले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरसकट कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, मात्र ते पूर्ण केले नाही, असेही त्यांनी म्हटले.

लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा

सुप्रिया सुळे यांनी सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला. “या योजनेतून 25 लाख महिलांची नावे कमी करण्यात आली आहेत. माझी सगळ्यांना विनंती आहे, झिरवाळ साहेब आपण ताकदीने याचा विरोध करायला हवा. 4 हजार 800 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. हजारो पुरुषांनी एवढे फॉर्म भरले कसे?” असा सवालही सुळे यांनी केला. लाडक्या बहीण योजनेची संपूर्ण चौकशी करणार असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

माणिकराव कोकाटेंवरही साधला निशाणा

सुप्रिया सुळे यांनी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर देखील टीका केली. पत्ते तुम्ही खेळायचे आणि कोर्टात चकरा आम्ही मारायच्या का? तुमची आब्रु तुमच्याच मागच्या माणसाने घालवली. व्हिडीओ कोणी काढला? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केला. रोहित पवार यांना सारख्या नोटीस येतात. पण आमचा रोहित घाबरत नाही, असेही त्या म्हणाल्या.

Supriya Sule: My Panduranga is Fine With Me Eating Mutton, What’s Your Problem?

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात