वृत्तसंस्था
नवी दिल्ली : CBI Raids Anil Ambani सीबीआयने रिलायन्स कम्युनिकेशन (आरकॉम) आणि त्यांचे संचालक अनिल अंबानी यांच्याविरुद्ध २,९२९.०५ कोटींच्या बँक फसवणूक प्रकरणात एफआयआर दाखल केला आहे. शनिवारी, एजन्सीने मुंबईतील कफ परेडमधील अंबानी यांच्या ‘सी विंड’ निवासस्थानाची आणि कंपनीच्या कार्यालयाची झडती घेतली. एसबीआयच्या तक्रारीवरून ही कारवाई झाली. २०१८ च्या आकडेवारीनुसार त्यांचे २,९२९ कोटींचे नुकसान झाले.CBI Raids Anil Ambani
आरकॉमवर एकूण ४०,४१३ कोटींचे कर्ज आहे. सीबीआयने म्हटले की, आरोपींनी बनावट कागदपत्रांवर एसबीआयकडून कर्ज घेतले. फॉरेन्सिक ऑडिट (२०२०) नुसार, कंपनीने बँकांकडून एकूण ३१,५८० कोटी रु. घेतले, त्यापैकी १३,६६७.७३ कोटी (४४%) बँका व एफआयआयची इतर कर्जे फेडण्यासाठी आणि १२,६९२.३१ कोटी (४१%) कंपन्यांच्या कर्जांच्या परतफेडीसाठी गेले. इतर बँक कर्जांच्या परतफेडीसाठी ₹६,२६५.८५ कोटी खर्च केले. ₹५,५०१ कोटी संबंधित कंपन्यांत आणखी ₹१,८८३ कोटी गुंतवले. एसबीआयच्या तक्रारीनंतर, २१ ऑगस्ट रोजी आरकॉम, अनिल, सरकारी कर्मचारी व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणाची ईडीही चौकशी करत आहे.CBI Raids Anil Ambani
अनिलवर 45,240 काेटींचे कर्ज
अनिल अंबानींच्या कंपन्यांवर एकूण ४५,२४० कोटी रुपयांचे कर्ज आहे. यापैकी ४०,४१३ कोटी रुपये एकट्या आरकॉमवर आहेत.अनिल अंबानी यांचे निवासस्थान ‘सी विंड.’ आरोप निराधार: अनिल अंबानींच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, हे प्रकरण एसबीआयच्या १० वर्षांपूर्वीच्या तक्रारीशी संबंधित आहे. एसबीआयने इतर पाच गैर-कार्यकारी संचालकांविरुद्धची कारवाई मागे घेतली आहे, परंतु अंबानींना निवडकपणे लक्ष्य केले जात आहे. हे प्रकरण एनसीएलटी-सर्वोच्च न्यायालय आणि इतर मंचांवर सहा वर्षांपासून प्रलंबित आहे. हे आरोप निराधार आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App