विशेष प्रतिनिधी
धारशिव : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. यामुळे अनेक जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा सामान्य नागरिकांना प्रचंड फटका बसलेला आहे व त्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. मात्र या अतिवृष्टीमुळे सगळ्यात जास्त नुकसान हे शेतीचं झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या मागण्या सध्या जोर धरत आहेत. अशातच केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. Pasha Patel
पाशा पटेल यांच वादग्रस्त विधान नेमकं काय?
‘ज्या पद्धतीने पावसाने नुकसान झालेले आहे. ते नुकसान कोणी भरून काढू शकेल का? तर नाही. शेतकऱ्यांचं जेवढंही नुकसान झालं आहे, ते भरून काढण्याची क्षमता कुणामध्येही नसू शकते;’ असं विधान पटेल यांनी केले आहे. मात्र ‘सध्या सरकारच्या वतीने आपण नुकसान भरपाई नाही, तर मदत करू शकतो. आपण फक्त मदत करू शकतो, जे नुकसान झालंय ते भरून काढणं आता शक्य नाही. तुमचं जे नुकसान आता दिसू लागला आहे, त्याची आता आपल्याला सवय करून घ्यावी लागणार आहे.’ असेही पाशा पटेल यांनी म्हटलं.
‘आता कधी पाऊस जास्त पडून तर कधी कमी पडून, हे असं नुकसान वारंवार होत राहणार आहे. कधी पाऊस न पडून, तर कधी तापमान वाढल्यामुळे, तर कधी गारपीट झाल्यामुळे किंवा कधीतरी थंडी वाढल्यामुळे, 365 दिवसांपैकी 322 दिवस शेतकऱ्यांवर हे संकट येणारच आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.’ अशी भविष्यवाणी ही पटेल यांनी करून टाकली. Pasha Patel
केवळ इतकेच नाही तर अतिवृष्टी व आपत्तीमुळे शेतकऱ्याचे होणारे नुकसान आता सरकार भरून देऊ शकत नाही असं म्हणत त्यांनी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी हात वर केले. शनिवारी (ता. 23) धाराशिव दौऱ्यावर असताना पाशा पटेल यांनी हे वक्तव्य केलं.
विजय घाडगे यांनी सुनावले खडे बोल
पटेल यांच्या वक्तव्यावर शेतकरी चळवळीतील नेते विजय घाडगे यांनी मात्र संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ‘शेतकऱ्यांच्या जीवावर आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नेता झालेल्या पाशा पटेल यांनी शेतकरी विरोधी भूमिका घेतली आहे. सोयाबीन आणि कापूस प्रश्नावर पाय दिंडी काढणाऱ्या पाशा पटेल यांनी जरा स्वतःचं आत्मपरीक्षण करावं’, असं म्हणत घाडगे यांनी पाशा पटेल यांना खडे बोल सुनावले आहेत. Pasha Patel
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App