विशेष प्रतिनिधि
मुंबई : काही दिवसांपूर्वीच मुंबईतली बेस्ट पतपेढीची निवडणूक पार पडली, अन् बॅलेट पेपरवरील निवडणुकीत देखील ठाकरे बंधूंच्या वाट्याला पराभवच आला. या निवडणुकीच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी राज ठाकरे फडणविसांच्या भेटीला गेले होते. आता त्याच पाठोपाठ अमित ठाकरेंनी देखील आशिष शेलारांची भेट घेतली आहे. Thackeray
अलीकडेच मुंबईत बेस्टची निवडणूक पार पडली. त्यात २० वर्षांनंतर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंच्या वाट्याला मात्र पराभव आला. ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केली, तेव्हाच ही युती आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यापुढे ठेऊन करण्यात आलेली आहे, हे अगदी स्पष्ट होतं. त्याच निवडणुकांच्या तोंडावर उफाळून आलेला मराठी भाषेचा मुद्दा मुंबईत ठाकरे बंधूंना तारून नेईल, अशी शक्यता वर्तवली जात होती.
मात्र, ज्या मुंबईत कधीकाळी ठाकरेंनी एकहाती वर्चस्व गाजवलं होतं. त्याच मुंबईतील बेस्टच्या अत्यंत महत्वाच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा दारूण पराभव झाला. त्या पराभवानंतर दुसऱ्याच दिवशी, राज ठाकरे थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले. त्या भेटीनंतर जेव्हा माध्यमांनी ठाकरेंना घेरलं, तेव्हा त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबतची ही भेट मुंबईच्या विकासाच्या दृष्टीने होती, असं उत्तर देत सारवासारव केली. या भेटीत पार्किंग आणि शहर नियोजन या संबंधित चर्चा झाली असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. Thackeray
राज ठाकरे यांना बेस्टच्या निवडणूकीसंदर्भात विचारलं असता, ‘हा आमच्यासाठी मोठा विषय नाही, अशा छोट्या मोठ्या निवडणुका होतच असतात’, असे उत्तर त्यांनी माध्यमांना दिले. परंतु, राजकीयदृष्ट्या या निवडणुकीकडे ठाकरे ब्रँडची लिटमस टेस्ट म्हणूनच बघितलं जात होतं. त्यामुळे याच अनुषंगाने ठाकरे यांनी फडणविसांची भेट घेतली असावी अशी शक्यता वर्तवली जात होती. Thackeray
या सगळ्या चर्चा चालू असतानाच राज ठाकरेंच्या पाठोपाठ अमित ठाकरेंनी देखील भाजपा नेते आशिष शेलार यांची भेट घेतली. त्यामुळे या भेटीनंतर आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या भेटीदरम्यान अमित ठाकरेंनी शेलारांकडे गणेशोत्सव काळातील शाळा आणि महाविद्यालयांच्या परीक्षा पुढे ढकल्याव्यात, अशी मागणी केली. मात्र ही मागणी केल्यानंतर आशिष शेलार यांच्या दालनातून सर्व पदाधिकारी बाहेर पडले. त्यानंतर पुन्हा शेलार आणि अमित ठाकरे यांच्यात चर्चा झाली.
आणि या दोघांच्या एकांतातील भेटीनंतर त्यांच्यात काय बोलण झालं असावं ? असे प्रश्न निर्माण झाले. तेव्हा राज ठाकरेंप्रमाणेच अमित ठाकरेंनी देखील उडवाउडवीची उत्तरं दिली. अमित ठाकरेंनी, ‘आमचे जुने सबंध आहेत, म्हणून आम्ही खाजगी चर्चा केली, यात कोणताही राजकीय विषय नव्हता’, असं उत्तर दिलं. मात्र त्यांच्या या उत्तरानंतर देखील अनेक अंदाज व्यक्त केले जात आहे. Thackeray
बेस्ट निवडणुकीतील पराभव, राज ठाकरे अन मुख्यमंत्र्यांची भेट आणि त्याच पाठोपाठ आता अमित ठाकरेंनी शेलारांची घेतलेली भेट या सगळ्या भेटीगाठी काही वेगळ तर सांगत नाही ना? राज ठाकरे पुन्हा फडणवीसांची साथ मागत आहेत का? ते आता पुन्हा भाजपाला किंवा महायुतीला पाठींबा देतील का ? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App