विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Rahul Gandhi राहुल गांधींच्या ‘मत चोरी’ आरोपांवर तथ्याधारित प्रत्युत्तर दिल्याने काँग्रेसने पत्रकार शिव अरोर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. थेट सत्य मांडणाऱ्या पत्रकारावर गुन्हा दाखल करून काँग्रेसने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणल्याची चर्चा सुरु आहे.Rahul Gandhi
एनडीटीव्हीवरील “India Matters” या मालिकेत 19 ऑगस्ट 2025 रोजी प्रसारित झालेल्या भागात अरोर यांनी सीएसडीएसचे संजय कुमार यांनी दिलेल्या सार्वजनिक माफीनाम्याचा दाखला देत राहुल गांधींचे आरोप खोट्या आणि चुकीच्या माहितीवर आधारित असल्याचे सांगितले.Rahul Gandhi
संजय कुमार यांनी महाराष्ट्रातील मतदार याद्यांबाबत चुकीची आकडेवारी दिली होती आणि नंतर त्यांनी ती चूक मान्य करून एक्सवर माफी मागितली होती. तरीही राहुल गांधी यांनी त्या चुकीच्या आकडेवारीवर निवडणूक आयोगावर व सरकारवर आरोप केले. या खोटेपणावर अरोर यांनी लक्ष वेधले आणि काँग्रेसच्या प्रचारातील फोलपणा उघड केला.Rahul Gandhi
यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पवन खेरा यांनी सोशल मीडियावर अरोर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे जाहीर केले. त्यांनी लिहिले की, “शिव अरोर यांचा राहुल गांधींना बदनाम करण्याचा प्रयत्न असफल ठरेल. आमचे वकील कायदेशीर लढाई लढतील.”
या कृतीवर राजकीय वर्तुळात टीका होत आहे. काँग्रेस पक्ष खोट्या आकडेवारीवर आधारित आरोप करताना दिसतो, आणि जेव्हा त्यावर प्रश्न विचारले जातात तेव्हा पत्रकारांवरच दडपशाही केली जाते असे मत व्यक्त होत आहे.
काँग्रेसचा हा निर्णय पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. खोटे उघड झाल्यामुळे संतापलेले काँग्रेस नेते आता न्यायालयाचा दरवाजा ठोठावत आहेत, परंतु यामागे खरी भीती राहुल गांधींच्या फोल दाव्यांची पोलखोल होण्याचीच असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App