शक्ती संवाद : महिला सक्षमीकरणाच्या बरोबरच भारतीय संघराज्य व्यवस्थेतला सुसंवाद वाढविण्याचाही सक्षम प्रयोग!!

नाशिक : राष्ट्रीय महिला आयोगाने शक्ती संवाद नावाचा उपक्रम हाती घेऊन त्याचा दुसरा उपक्रम आज पासून दोन दिवस मुंबईत आयोजित केला. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे प्रमुख, त्याचबरोबर संबंधित मंत्री आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि पदाधिकारी हे सर्वजण उपस्थित होते. दोन दिवस चालणाऱ्या या शक्ती संवादामध्ये महिला सक्षमीकरणाचे वेगवेगळे विषय हाताळले जाणार आहेत. पण एकूणच हा शक्ती संवाद महिला सक्षमीकरणाबरोबरच भारतीय संघराज्य व्यवस्थेमध्ये अपेक्षित असलेल्या संवादाचा दृढीकरणाचाही प्रयोग ठरतो आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहटकर यांनी घेतलेली सर्वसमावेशक भूमिका त्यासाठी कारणीभूत ठरली आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाने शक्ती संवादाचा पहिला उपक्रम श्रीरामाच्या अयोध्येमध्ये यशस्वी केला. त्याला अन्य राज्यांच्या महिला आयोगांची साथ लाभली. त्यानंतरचा दुसरा शक्ती संवादाचा उपक्रम मुंबईत हॉटेल ट्रायडेंट मध्ये होतो आहे.

– राष्ट्रीय आणि राज्य पातळ्यांवरचे आयोग एकत्र

एरवी केंद्र सरकार मधल्या विविध घटकांची तोंडे एकीकडे आणि राज्य सरकारांच्या विविध घटकांची तोंडे दुसरीकडे, अशी राजकीय आणि सामाजिक विसंवादी अवस्था असताना राष्ट्रीय महिला आयोगाने मात्र एक सुसंवादी आणि सुसंगत भूमिका घेतली. देशभरातल्या राज्यांमधल्या सर्व महिला आयोगांना सहकार्याच्या भूमिकेत आपल्या समवेत घेतले. दोन्ही पातळ्यांवरच्या आयोगांनी एकत्र येऊन शक्ती संवाद हा कार्यक्रम आखला. त्यामध्ये राष्ट्रीय महिला आयोगाने कार्यक्रमांची आखणी ते अंमलबजावणी यामध्ये राज्यांच्या महिला आयोगांच्या योगदानाचाही सहभाग वाढविला हे खरं म्हणजे संघराज्य पद्धतीच्या अंमलबजावणीचे मोठे वैशिष्ट्य मानले पाहिजे.

– संघराज्य व्यवस्थेचा प्रवास

एरवी फक्त पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्यातला संवाद किंवा केंद्रीय मंत्री आणि राज्यांमध्ये मंत्री यांच्यातला संवाद म्हणजे संघराज्य व्यवस्था दृढीकरण असे मानायची प्रथा होती. देशात आणि राज्यांमध्ये एकाच पक्षांची सरकारे असताना ते ठीक होते. पण केंद्रात वेगळ्या पक्षांचे सरकार आणि राज्यांमध्ये वेगळ्या पक्षांची सरकार आल्यानंतर त्यांच्यातला संवाद तुटून विसंवाद निर्माण झाला आणि तो विसंवाद नंतर राजकीय वैराच्या पातळीवर पोहोचला इथपर्यंत भारतीय संघराज्य व्यवस्थेचा राजकीय प्रवास झाल्याचे चित्र आपण सर्वांनी पाहिले.

– मोकळ्या मनाने स्वागत करू या!!

या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महिला आयोगाने शक्ती संवाद उपक्रमाद्वारे घेतलेली सर्वसमावेशक भूमिका ही खऱ्या अर्थाने दीपस्तंभा सारखी ठरली. हे उगाचच कुठल्या नेतृत्वाची स्तुती करायची किंवा कुणावर तरी टीका करायची म्हणून लिहिण्यात मतलब नाही, पण जर खरंच केंद्रीय पातळीवरचा एखादा महत्त्वाचा घटक अशी व्यापक आणि सर्वसमावेशक भूमिका घेत असेल, तर त्याबद्दल हातचे राखून बोलण्यात‌ किंवा लिहिण्यात मतलब नाही. त्यामुळे राजकीय कक्षेबाहेरच्या विषयांमध्ये विशेषतः महिला सक्षमीकरण, महिलांच्या समस्या यासारख्या संवेदनशील विषयांमध्ये राष्ट्रीय महिला आयोग आणि राज्यांचे महिला आयोग यांच्यातला सहयोग वाढत असेल आणि तो दृढमूल होत असेल, तर त्याचे संघराज्य व्यवस्थेत मोकळ्या मनाने स्वागतच केले पाहिजे. हे स्वागत करताना कुठलाही राजकीय अथवा सामाजिक संकोच बाळगायचे कारण नाही.

Shakti samvad; NCW implementing true spirit of Indian federalism

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात