vice president : आघाडीच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवारावर नक्षलवादी कनेक्शन असल्याचा आरोप !

vice president

विशेष प्रतिनिधि 

मुंबई : देशात लवकरच उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूका होण्याची शक्यता आहे. अशातच इंडिया आघाडीच्या वतीने सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी मिळालेली आहे. परंतु रेड्डी यांचे नक्षलवादी गटांशी संबंध असल्याचे आरोप त्यांच्यावर केले जात आहेत. vice president



भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी बी. रेड्डी यांच्यावर नक्षलवादी गटांशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. केशव उपाध्ये यांनी सलवा जुडूम ही चळवळ गावातील नक्षली कारवायांमुळे त्रस्त झालेल्या गोरगरीब गावकऱ्यांनी सुरू केली होती. परंतु २०११ मध्ये न्या. रेड्डी यांनी या प्रकरणावर दिलेल्या निकलामुळे छत्तीसगड सरकारचे नक्षली हिंसाचारविरोधी अभियान अयशस्वी झाल्याचा आरोप बी रेड्डी यांच्यावर केला आहे.

बी. रेड्डी यांच्या निकालामुळे सलवा जुडूमसारख्या स्थानिक प्रतिकार चळवळींचा पाया डळमळीत झाला आणि माओवाद्यांना अप्रत्ययक्षपणे संरक्षण देखील मिळाले. मुळात या प्रकरणातील याचिकाकर्त्यांवरच नक्षलवादी गटांशी संबंध असल्याचे आरोप होते. ज्यामुळे या निकालाच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असल्याचं देखील उपाध्ये यांनी नमूद केले आहे. vice president

नक्षलवादी गटाशी संबंध असलेल्या उमेदवाराला उबाठा आणि शरद पवार गट पाठिंबा देणार का?

न्यायमूर्ती व काँग्रेसचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी सर्वसामान्यांच्या आक्रोशातून, त्रासातून सुरू झालेल्या सलवा जुडूम या नक्षलविरोधी चळवळीच्याच विरोधात निकाल दिला होता. आता अशा उमेदवाराला उबाठा आणि शरद पवार गट पाठिंबा देणार का? असा खोचक सवाल उपाध्ये यांनी ठाकरे आणि पवारांना केला आहे. vice president

केशव उपाध्ये यांनी त्यांच्या ‘एक्स’या त्यांच्या सोशल मीडिया हॅंडलवर ‘मा. बाळासाहेब ठाकरे यांनी कायम धगधगता भगवा प्राणप्रिय मानला. नक्षलवादी चळवळीला त्यांनी कायम विरोधच केला. पण सत्तेसाठी हाच भगवा त्यागून कॉंग्रेसच्या वळचणीला गेलेले व राहुल गांधीच्या दरबारात शेवटच्या रांगेचे मांडलिकत्व स्वीकारलेले उध्दव ठाकरे हे लाल सलाम करणार का याचे उत्तर संजय राऊत यांनी दिले पाहिजे.’ असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

इतकेच नाही तर पुढे, ‘सोनिया राहुल दरबारातील अंकित संजय राऊत याचेही समर्थन करतील व ‘ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे दैनिक’ ही ‘सामना’ची टॅगलाईन बदलून ‘सत्तेसाठी लाल सलाम करणारे दैनिक’ अशीही करतील,’ असं म्हणत उपाध्ये यांनी संजय राऊत यांना देखील खडे बोल सुनावले आहेत. vice president

Allegations of Naxalite connections against the front’s vice-presidential candidate!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात