Anjali Damania : अंजली दमानियांनी केले भाकीत- सप्टेंबरनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी; शिंदेंचा भाव वाढणार, राज भाजपसोबत जातील

Anjali Damania

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Anjali Damania आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल काही मोठे दावे केले आहेत. सत्ताधारी एनडीएमध्ये सध्या सर्वकाही सुरळीत नसल्याचे दिसत असून, त्याचा परिणाम महाराष्ट्रातील राजकारणावरही होईल, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. शिवाय सध्याच्या घडामोडीत एकनाथ शिंदे यांचा भाव वाढेल परंतु सप्टेंबरनंतर काय होईल सांगता येत नाही, असेही त्या म्हणाल्या.Anjali Damania

अंजली दमानिया म्हणाल्या की, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवाराला सत्ताधारी घटक पक्षांचे पुरेसे समर्थन मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीच्या नेत्यांशी बोलण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आली आहे. या राजकीय घडामोडींमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच ते कॅबिनेट बैठकीलाही गैरहजर होते, अशी चर्चा आहे.Anjali Damania



एकनाथ शिंदेंचा भाव वाढेल

सप्टेंबरनंतर अनेक राजकीय घडामोडी बदलताना दिसतील. केंद्र सरकारमध्ये खूप उलथापालथ होताना दिसते. त्याचेच पडसाद महाराष्ट्रात उमटताना दिसतात. देवेंद्र फडणवीसांना त्यासाठीच जबाबदारी दिलेली आहे. आताच्या घटकेला एकनाथ शिंदे यांना स्वत:सोबत ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करा. सध्याच्या घडामोडीत एकनाथ शिंदे यांचा भाव वाढेल परंतु सप्टेंबरनंतर काय होईल सांगता येत नाही, असे अंजली दमानिया यांनी म्हटले. त्या टीव्ही 9 मराठीशी बोलत होत्या.

राज ठाकरे भाजपसोबत जातील

अंजली दमानिया यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राजकीय भूमिकेवरही भाष्य केले. राज ठाकरे हे भविष्यात भाजपसोबतच जातील, असे स्पष्टपणे दिसत असल्याचे त्या म्हणाल्या. उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांना राजकीय भवितव्य नाही, हे त्यांनाही कळले आहे. राज ठाकरे कधीतरी उद्धव ठाकरेंना अडचणीत आणतील. भाजपसमोर स्वतःचे महत्त्व वाढवण्यासाठी त्यांनी काही विधाने केली असली तरी, त्यांची उद्धव ठाकरेंसोबत जाण्याची कोणतीही इच्छा दिसत नाही, असेही दमानिया यांनी म्हटले.

Anjali Damania Predicts Major Political Changes in Maharashtra

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात