सत्तेच्या कामासाठी संघ स्पृश्य, पण सामाजिक कामासाठी अस्पृश्य; यशवंत + पवार संस्कारांचा पुरोगामी ढोंगी स्पर्श!!, असं म्हणायची वेळ शरद पवारांचे नातू आमदार रोहित पवारांच्या एका ट्विट मुळे आली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुनेत्रा पवार राष्ट्रसेविका समितीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर रोहित पवारांनी यशवंतराव चव्हाण यांच्या पुरोगामी संस्कारांची आठवण करून देणारे ट्विट केले. त्यांनी त्यात अजित पवारांना टोले हाणले. जणू काही अजित पवारांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार या संघाच्या कार्यक्रमाला गेल्यामुळे “फार मोठे पाप” घडले, असा आव रोहित पवारांनी त्या ट्विट मधून आणला. त्या ट्विटला यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांच्या “पुरोगामी संस्कारांची फोडणी” दिली. Sangh is touchable for power work; but untouchable for social work;
पण हे तेच रोहित पवार आहेत आणि तेच शरद पवार किंवा यशवंतराव चव्हाण आहेत, ज्यांना सत्तेच्या कामासाठी संघ स्पृश्य वाटला, पण सामाजिक कामासाठी तो अस्पृश्य वाटला.
वास्तविक खासदार कंगना राणावत यांच्या घरी भरलेल्या राष्ट्रसेविका समितीच्या शाखेच्या कार्यक्रमाला खासदार सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. त्या कार्यक्रमात अन्य पक्षांच्याही खासदार उपस्थित होत्या. त्या संदर्भातले ट्विट कंगना राणावत यांनी केले, पण त्यामध्ये सुनेत्रा पवारांचा फोटो पाहून रोहित पवारांना पुरोगामी विचारांचे भरते आले. आपल्या काकू काय करून बसल्या??, संघासारख्या प्रतिगामी संघटनेच्या कार्यक्रमाला कशा काय गेल्या??, त्या यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांच्या पुरोगामी विचारापासून कशा काय ढळल्या??, याविषयी वाईट वाटले. म्हणून त्यांनी अजित पवारांना आणि सुनेत्रा पवारांना यशवंतराव चव्हाण यांच्या पुरोगामी संस्कारांची आठवण करून दिली. त्यावर सुनेत्रा पवारांनी खुलासा करणारे ट्विट देखील केले. बारामतीच्या खासदार म्हणून काम करताना आपण अनेक महिला संघटनांच्या कार्यक्रमांना जातो, तसाच तो कार्यक्रम होता. तिथे मला बोलायला सांगितल्यानंतर मी फक्त 2 मिनिटांमध्ये माझे विचार व्यक्त केले. त्यातून कुठलाही राजकीय अर्थ काढू नये, असे सुनेत्रा पवारांनी त्या ट्विटमध्ये नमूद केले.
एका मीटिंगमध्ये माझ्या उपस्थितीबाबत चर्चा सुरू आहे, ज्याबाबत मी स्पष्टीकरण देऊ इच्छिते की त्यामागे कोणताही राजकीय उद्देश्य नव्हता. यात इतर महिला खासदारही सहभागी होत्या. राज्यसभेच्या खासदार म्हणून आणि बारामतीमध्ये दीर्घकाळ सामाजिक कार्य करत असताना, मला विविध महिला संघटनांच्या… — Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) August 21, 2025
एका मीटिंगमध्ये माझ्या उपस्थितीबाबत चर्चा सुरू आहे, ज्याबाबत मी स्पष्टीकरण देऊ इच्छिते की त्यामागे कोणताही राजकीय उद्देश्य नव्हता. यात इतर महिला खासदारही सहभागी होत्या. राज्यसभेच्या खासदार म्हणून आणि बारामतीमध्ये दीर्घकाळ सामाजिक कार्य करत असताना, मला विविध महिला संघटनांच्या…
— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) August 21, 2025
वास्तविक सुनेत्रा पवार राष्ट्रसेविका समितीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या यात फारसे काही बिघडले नाही, तरी देखील रोहित पवारांना यशवंतरावांच्या विचारांची आठवण करून द्यावेसे वाटले आणि सुनेत्रा पवारांना खुलासा करावासा वाटला यातूनच यशवंतराव आणि पवार विचारांच्या पुरोगामीत्वाच्या ढोंगीपणाची प्रचिती येते. यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार ही कधी संघाच्या कार्यक्रमाला प्रकटपणे उपस्थित राहिले नव्हते. विशेषतः सत्तेचे राजकारण केल्यानंतर तर संघापासून ते चार हात दूरच राहिले होते. पण काँग्रेसची सत्तेच्या राजकारणाची बाहेर फेकले गेल्यानंतर किंबहुना सत्तेची उब पुन्हा मिळवण्यासाठी मात्र यशवंतराव आणि शरद पवार यांना संघाची मदत घ्यायला कुठल्याही प्रकारची लाज वाटली नव्हती. 1978 मध्ये वसंतदादा पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसून शरद पवार मुख्यमंत्री झाले. त्यावेळी जनसंघाच्या उत्तमराव पाटलांना त्यांनी उपमुख्यमंत्री केले होते, याची आठवण राम नाईक यांनी काही दिवसांपूर्वीच करून दिली होती. शिवाय त्यांच्या मंत्रिमंडळात जनसंघाचे काही नेते मंत्री झाले होते. काँग्रेस मध्ये बंडखोरी करून सत्तेवर येण्यासाठी शरद पवारांना जनसंघाची साथ संगत चालली होती. त्यावेळी जनसंघ किंवा संघ त्यांच्यासाठी अस्पृश्य नव्हते, पण सामाजिक कामासाठी मात्र ते लगेच अस्पृश्य ठरले होते.
आज मेरे आवास पर ‘राष्ट्र सेविका समिति’ महिला शाखा का आयोजन हुआ।हम सब मिलकर सनातन मूल्यों, हिन्दू संस्कृति और राष्ट्रीय चेतना को और प्रखर बनाएंगे।हम सबका संकल्प है कि मानव सेवा, राष्ट्र निर्माण और सनातन संस्कृति के संरक्षण के लिए निरंतर कार्य करते रहेंगे।महिलाओं की जागरूकता और… pic.twitter.com/Cu5PecbELP — Kangana Ranaut (@KanganaTeam) August 20, 2025
आज मेरे आवास पर ‘राष्ट्र सेविका समिति’ महिला शाखा का आयोजन हुआ।हम सब मिलकर सनातन मूल्यों, हिन्दू संस्कृति और राष्ट्रीय चेतना को और प्रखर बनाएंगे।हम सबका संकल्प है कि मानव सेवा, राष्ट्र निर्माण और सनातन संस्कृति के संरक्षण के लिए निरंतर कार्य करते रहेंगे।महिलाओं की जागरूकता और… pic.twitter.com/Cu5PecbELP
— Kangana Ranaut (@KanganaTeam) August 20, 2025
– 1980 च्या निवडणुकीत यशवंतरावांना जनसंघाची मदत
1980 च्या निवडणुकीत यशवंतराव चव्हाण यांनी इंदिरा गांधींना आव्हान दिले होते. इंदिरा काँग्रेसच्या विरोधात त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. कराड या पारंपरिक मतदारसंघात त्यावेळी त्यांच्या समोर शालिनीताई पाटलांनी मोठे आव्हान उभे केले होते. ते आव्हान यशवंतरावांना चांगलेच जड गेले. कराड मधून आपला पराभव होणार ही यशवंतराव चव्हाणांना लक्षात आले. त्या पराभवातून आपले सगळे राजकारण संपुष्टात येईल याची भीती त्यांना वाटली. त्यावेळी त्यांनी जनसंघाच्या काही कार्यकर्त्यांची मदत घेतली होती. शालिनीताई यांच्या विरोधात आपल्याला मदत करा, अशी जनसंघाच्या कार्यकर्त्यांना गळ घातली होती. जनसंघाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीमुळेच यशवंतराव फार थोडक्या फरकाने कराड मधून निवडून येऊन लोकसभेत पोहोचले होते. यशवंतरावांना सत्तेचे राजकारण करताना जनसंघ नकोसा होता. संघ अस्पृश्य वाटत होता, पण स्वतःचा पराभव डोळ्यासमोर दिसतात आणि राजकारण संपण्याची भीती निर्माण होतात यशवंतरावांना जनसंघाच्याच कार्यकर्त्यांची मदत घ्यावीशी वाटली. त्यांना त्यावेळी दुसरा पर्याय दिसला नाही. जनसंघाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने ते लोकसभेत पोहोचणारे त्यांच्या चव्हाण + रेड्डी (चड्डी) काँग्रेसचे ते महाराष्ट्रातले एकमेव खासदार होते.
त्यामुळे सुनेत्रा पवार राष्ट्रसेविका समितीच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर रोहित पवारांच्या अंगावर पुरोगामी विचारांचा काटा आला असला, तरी यशवंत आणि पवार यांच्या विचारांचा ढोंगी पुरोगामी विचारांचा काटा आहे. त्या पलीकडे काही नाही हे निश्चित मान्य करावे लागेल.
– संघ आणि भाजप साठी धडा
खरं म्हणजे रोहित पवार काय किंवा सुनेत्रा पवार काय, ज्या पुरोगामी यशवंत आणि पवारांच्या विचारांचा ते हवाला देतात, त्यावरून खरं म्हणजे संघ आणि भाजपने धडा शिकला पाहिजे. स्वतःच्या सत्तेचे राजकारण टिकवण्यासाठी हे ढोंगी पुरोगामी आपल्या वळचणीला येताच, त्यावेळी त्यांना योग्य त्या अंतरावर राखून प्रसंगी ठाकून ठोकून धडा शिकवला पाहिजे. त्यांच्या पुरोगामी बडबडीला चाप लावण्यासाठी त्यांच्या सत्तेच्या राजकारणाला वरून आणि खालून सुरुंग लावला पाहिजे. हातात सत्ता असताना हे करता येणे सहज शक्य आहे. तिथे उगाच “सर्वसमावेशक” संघ संस्कार आडवे आणून चालणार नाहीत. त्याचबरोबर संघ संस्कारांची रांगोळ्या काढणारी गुळगुळीत आणि बुळबुळीत भाषा वापरूनही चालणार नाही. ढोंगी पुरोगाम्यांना वठणीवर आणण्यासाठी त्यांच्या संस्था, संघटना, कारखाने मोडून काढले पाहिजेत. यशवंत आणि पवार संस्कारांची ढोंगी पुरोगामी बाष्कळ बडबड मोडून काढण्यासाठी त्यांना ठोकून काढले पाहिजे, तरच या पुरोगाम्यांचे ढोंग उद्ध्वस्त करता येईल. अन्यथा हे आपल्या डोक्यावर मिरेच वाटत बसतील, हा धडा खरं म्हणजे संघ आणि भाजपच्या नेत्यांनी शिकला पाहिजे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App