विशेष प्रतिनिधि
मुंबई : बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकांमध्ये ठाकरे बंधूंचा दाणून पराभव झालेला आहे. ठाकरे बंधूंची उत्कर्ष पॅनलला एकही जागा जिंकता आलेली नाहीये. मात्र ठाकरे बंधूंच्या नेत्यांना हा पराभव पचवता आलेला नाहीये. Sushma Andhare
बेस्ट सोसायटीच्या निवडणूका हरल्याने भाजपाने ठाकरे ब्रॅंड अपयशी ठरल्याचं म्हणतं ठाकरे बंधूंना टार्गेट केलं. मात्र अपयश पचवता न आल्याने ठाकरे गटाचे नेते पोरकटपणाचं वक्तव्य करत आहेत. संजय राऊत यांच्या पाठोपाठ आता सुषमा अंधारे यांनीही असंच काहीस वक्तव्य केलं आहे. ‘आमचा नाही तर तुमचाच पराभव झाला आहे,’ असं म्हणत ही निवडणूक मतपत्रिकांवर झाल्यानं भाजपचाच यात पराभव झाल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेच्या पराभवानंतर सुषमा अंधारे यांनी पहिल्यांदाच या निवडणुकीवर आपली भूमिका मांडली. पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना ही कुठल्याही निवडणुकीची रंगीत तालीम नसल्याचं अंधारे यांनी म्हटलं आहे. ही केवळ माध्यमांचीच बातमी आहे माध्यमांनी याला सेमी फायनल वगैरे म्हणायला सुरुवात केली होती नऊ वर्षांच्या सत्तेनंतर या निवडणुकीत बदल झाला. लोकांना कदाचित कुस बदलावीशी वाटली असेल मात्र भाजपची तर दिल्लीपासून सगळीकडेच सत्ता आहे तरीही भाजपा बेस्टच्या निवडणुकीत हारलं आहे, असं वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केलं आहे. Sushma Andhare
नेमक काय बोलल्या सुषमा अंधारे?
बेस्ट निवडणुकीत भाजपा सपशेल तोंडघशी पडली आहे. पराभव त्यांचाही झाला आहे. जेव्हाही बॅलेट पेपरवर निवडणूका झाल्या आहेत तेव्हा भाजपा हारली आहे. कालच्या निवडणुकीत भाजपा अपयशी झाली आहे. शशांक राव यांच्या आघाडीला जिंकल्यानंतर ते आपलेच आहेत, असं भाजपा म्हणत आहे. हे म्हणजे दुसऱ्याच पोर आपल्या अंगा-खांद्यावर खेळवल की ते आपलंच म्हणायचं असा प्रकार झाला.
महानगरपालिका निवडणुकांना अजून वेळ आहे. एका पराभवानंतर भूमिका बदलाव्यात ठाकरे इतके तकलादू नाहीत. ठाकरेंनी एखादी भूमिका घेतली की ते कणखरपणानेच घेतात. ठाकरेंचा हा कणखर बाणा भविष्यातही तसाच राहील. Sushma Andhare
‘भाजपा निवडणूक हारली आहे’ हे बोलतांना सुषमा अंधारेंना कदाचित त्यांनी एकही जागा न जिंकता आल्याचा विसर पडला असावा. ईव्हीएम च्या नावाने रडून झाल्यानंतर आता बॅलेट पेपर वरचा पराभव ठाकरे गटाला पचवता न आल्याचं दिसते आहे. त्यामुळेच स्वतःच्या पॅनलला एकही जागा जिंकता आलेली नसतानाही दुसऱ्या गटाला निवडणूक हारल्याचं ठाकरे गटाचे नेते म्हणत आहेत. समोरच्याकडे एक बोट दाखवत असताना चार बोट आपल्याकडे असतात. तसंच समोरच्या गटाला सात जागा मिळाल्या असल्या तरी आपल्याला एकही मिळाला नसल्याचा विसर सुषमा अंधारे यांना पडलेला दिसतोय.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App