बेस्ट कामगार पतपेढीची निवडणूक ठाकरे बंधूंनी एकी करून देखील ते हरले. त्यानंतर भाजपच्या मुंबईतल्या नेत्यांनी विजय उत्सव साजरा केला तर ठाकरे बंधूंनी ती निवडणूक किरकोळ आणि छोटी असल्याची मखलाशी केली. ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली त्यांनी शशांक राव यांना आतून मदत केली होती त्यामुळे शशांक राव यांचे चर्चेत नसलेले पॅनल जिंकून आले, असे विश्लेषण मराठी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले.Thackrey brothers shuned BEST election as smaller one from afterthought
पण एकूणच बेस्ट पतपेढीची निवडणूक गाजली किंवा गाजवली, ती ठाकरे बंधूंच्या ऐक्यामुळे. ठाकरे बंधूंनी राजकीय ऐक्य साधले. ते एकत्रित पॅनल करून बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीला सामोरे गेले. त्यामुळे भाजपने आयात केलेले नेते प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांनी ठाकरे बंधूंच्या विरोधात वेगळे पॅनल उभे केले. या सगळ्यामुळे त्या निवडणुकीला एकदम ग्लॅमर प्राप्त झाले. अशी ग्लॅमर प्राप्त झालेली निवडणूक मराठी माध्यमांनी चर्चेची ठरविली. बेस्ट पतपेढीची निवडणूक ठाकरे बंधूंच्या ऐकण्यासाठी लिटमस टेस्ट ठरेल. त्यांनी या निवडणुकीत बाजी मारली तर मुंबई महापालिकेच्या आणि अन्य महापालिकांच्या निवडणुकांमध्ये दोन्ही बंधूंचा राजकीय ऐक्य साधण्याचा प्रयत्न फलद्रूप ठरेल अशा अटकळी मराठी माध्यमांनी बांधल्या. त्याचबरोबर शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी त्या अटकळींना दुजोरा दिला.
– भाजपचा होरा
त्याचबरोबर बेस्टच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा आपण पराभव केला, तर त्यांचे मनोधैर्य खचेल त्यांचे राजकीय ऐक्य टिकून राहणार नाही त्यामुळे आपणही बेस्ट प्रतपेढीची निवडणूक प्रतिष्ठेची करून ती लढवली आणि जिंकली तर फार मोठी बाजी मारली असा होरा भाजपच्या नेत्यांनी बांधला म्हणून तर प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांच्यासारखे आयात आमदार त्या निवडणुकीत उतरविले गेले.
निवडणुकीच्या निकालानंतर मात्र ठाकरे बंधूंनी ही निवडणूक फारच छोटी असल्याचे ठरविले. त्यावर उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया सुद्धा व्यक्त केली नाही. त्यांच्या शिवसेनेतून प्रतिक्रिया आली, ती संजय राऊत यांची आणि पॅनल प्रमुख सामंत यांची. त्यानंतर आज प्रतिक्रिया व्यक्त केली, ती सुषमा अंधारे यांनी. त्यांनी आशिष शेलार यांना फार उडू नका पराभव तुमचा पण झालाय, असा टोला हाणला. राज ठाकरे यांनी देखील आज प्रतिक्रिया व्यक्त करताना अशी काही निवडणूक झाली होती की काय??, अशी शंका व्यक्त केली. ती निवडणूक फारच “किरकोळ” असल्याची मखलाशी त्यांनी केली. शशांक राव यांचा कामगारांवर प्रभाव होता म्हणून ते निवडणूक जिंकले. यात ठाकरे ब्रँडचा संबंध नव्हता, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. पण या सगळ्यांनी ही निवडणूक “छोटी” आणि “किरकोळ” असल्याची बाब प्रतिक्रियांमधून अधोरेखित केली.
– शेलारांचा राणा भीमदेवी थाट
आशिष शेलार यांनी राणा भीमदेवी थाटात आधी प्रसाद लाड आणि शशांक राव यांच्याशी निपटा आणि नंतर आमच्याशी लढायला या, असे आव्हान ठाकरे बंधूंना दिले. जणू काही आपण भाजपचे स्वयंभू आणि फार मोठे नेते आहोत, असा आव आशिष शेलार यांनी आणला.
– निकाल उलटा लागला असता तर…
पण बेस्ट निवडणुकीचा निकाल उलटा लागला असता आणि ठाकरे बंधू जिंकून भाजपचे आयात केलेले नेते हरले असते, तर ठाकरे बंधूंच्या पक्षांनी या निवडणुकीला पाश्चात बुद्धीने छोटे किंवा किरकोळ ठरवली असते का आणि आशिष शेलार यांच्यासारखे दुसऱ्या फळीतले नेते ठाकरे बंधूंना आव्हान तरी देऊ शकले असते का??, हे सवाल महत्त्वाचे आहेत आणि त्यांची उत्तरे ठामपणे नकारार्थी आहेत. बेस्टचा निकाल ठाकरे बंधूंच्या बाजूने लागला असता, तर या दोन्ही बंधूंनी ती निवडणूक जिंकली म्हणजे जणू काही महाराष्ट्र विधानसभा जिंकली किंवा मुंबई महापालिका जिंकली, असा आव आणला असता. मुंबईभर त्याचे ढोल + ताशे वाजविले असते. भाजपच्या नेत्यांना हिणवले असते. भाजपच्या नेत्यांनी सुद्धा निवडणुकीतून धडा घेऊन आम्ही आत्मपरीक्षण करू. संघटना नीट बांधून मतदारांपुढे जाऊ. मुंबई महापालिका जिंकू, वगैरे बाता मारल्या असत्या.
– सगळे ब्रँड मोडीत निघाले असते म्हणून…
पण निवडणूक निकालांनी हे सगळे चित्र उलटेपालटे करून टाकले. सगळ्याच पक्षांच्या नेत्यांना पश्चात बुद्धीने बेस्ट कामगारांच्या पतपेढीची निवडणूक ही कामगार संघटनांची पार्श्वभूमी असलेल्या शशांक राव यांनी जिंकली, याची कबुली द्यावी लागली. आणि ती कबुली देतानाच पश्चात बुद्धीने सगळ्यांना बेस्टची निवडणूक “छोटी” आणि “किरकोळ” ठरवावी लागली. कारण ही निवडणूक “छोटी” आणि “किरकोळ” ठरविली नसती तर त्यातला पराभव आणि विजय “मोठा” दिसला असता. दोन्हीकडचे ब्रँड साईज पेक्षा फार मोठे किंवा फार कमी ठरले असते. त्यातून पुढच्या खऱ्या मोठ्या निवडणुकीतल्या आव्हानांचे गणित बिघडले असते. त्यामुळे बेस्ट पतपेढीची निवडणूक “छोटी” आणि “किरकोळ” ठरवणे सगळ्यांच्या सोयीचे झाले म्हणून सगळ्यांनी पश्चात बुद्धीने ती निवडणूक “छोटी” आणि “किरकोळ” ठरवली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App