Raj Thackeray : राज ठाकरेंनी सांगितलं फडणविसांना भेटण्याचं कारण !

Raj Thackeray

विशेष प्रतिनिधि 

मुंबई : आज राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर भेटीचे कारण नक्की काय? यावरून राजकीय चर्चांना उधाण आले. मात्र आता स्वतः राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे. Raj Thackeray



बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेच्या संयुक्त उत्कर्ष पॅनलला पराभवाचा सामना करावा लागला. उत्कर्ष पॅनलमधील सर्वच्या सर्व २१ उमेदवारांचा दाणून पराभव झाला. तर दुसरीकडे भाजपाचे प्रसाद लाड आणि शशांक राव यांच्या पॅनलचा मोठा विजय झाला. हे सगळं झालेलं असतांनाच राज ठाकरेंनी घेतलेली फडणविसांची भेट ही चर्चेचा विषय ठरते आहे. भेटीमागचं कारण आता राज ठाकरेंनी स्वतःच पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे.

काय म्हणले राज ठाकरे?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील वाढत्या बेशिस्तपणा आणि ट्रॅफिक समस्येबद्दल चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचं सांगितलं. यावेळी मुंबईच्या विकासासाठी एक छोटा परंतु प्रभावी असा आराखडा मुख्यमंत्र्यांसामोर सादर केल्याचं देखील राज ठाकरे यांनी म्हणलंय. आपल्याकडे केवळ ‘लॉ’ आहे परंतु ‘ऑर्डर’ नाही, असं म्हणत राज ठाकरेंनी घेतलेले निर्णय अंमलात आणायची ही तितकीच गरज असल्याचं सांगितलं. Raj Thackeray

मुंबईतील वाढती ट्रॅफिक चिंताजनक

‘ट्रॅफिकची परिस्थिती पाहिली की तुमच्या देशाची परिस्थिती दिसते’ असं म्हणत राज ठाकरे यांनी वाढत्या ट्रॅफिक समस्येवर चिंता व्यक्त केली. मुंबईत गाड्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अगोदर जिथे चार जण राहत होते, तिथेच आता ५०० जण राहतात परंतु रस्ते तितकेच आहेत, असे राज ठाकरे यांनी सांगितलं. वाहनांच्या संख्येत वाढ झालेली असली तरीही रस्त्यांची क्षमता आणि शिस्त यांचा मात्र आपल्याकडे अजूनही अभाव आहे. सिग्नल न पाळणे चुकीच्या ठिकाणी पार्किंग करणे आणि फुटपाथवर अतिक्रमण यामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल होत असल्याचं ठाकरे यांनी नमूद केलं.

विकास आराखड्यात नेमकं काय?

राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर सादर केलेल्या विकास आराखड्यात कडक नियम तसेच, टाऊन प्लॅनिंग वर भर दिलेला आहे. चुकीच्या पार्किंग वर मोठा दंड किंवा तुरुंगवासाची शिक्षा असावी. तसेच पार्किंग आणि नो पार्किंग झोन साठी रंगीत मार्किंग असावे जेणेकरून नागरिकांना नियम स्पष्ट होतील, असेही राज ठाकरे यांनी म्हटले. तसंच शहर नियोजनासाठी तज्ञांची समिती स्थापन करण्याची मागणीही त्यांनी केली. Raj Thackeray

मुंबईकरांनाही केलं आवाहन

राज ठाकरे यांनी, शहराची शिस्त आपल्याच हातात असल्यामुळे नियम पाळा, ट्राफिक नियमांचे उल्लंघन टाळा, असं आवाहन राज ठाकरेंनी मुंबईकरांना केलं. तसेच सरकारलाही त्यांनी तातडीने टाऊन प्लॅनिंग वर काम सुरू करण्याची मागणी केली. सरकारने अनावश्यक ठिकाणी भीती दाखवण्यापेक्षा मूलभूत समस्यांकडे लक्ष द्यावे असाही सल्ला राज ठाकरे यांनी सरकारला दिला.

Raj Thackeray explains the reason for meeting Fadnavis!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात