विशेष प्रतिनिधी
पुणे : अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांचा ‘जॉली एलेलबी ३’ हा चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. गेल्या आठवड्यात निर्मात्यांनी या चित्रपटाचा टीझर रिलीज केला. मात्र रिलीज पूर्वीच हा चित्रपट आता वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे. Akshay Kumar
पुणे दिवाणी न्यायालयाने कायदा आणि सुवयेवस्थेची खिल्ली उडवल्याबद्दल अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांना समन्स पाठवले आहे. वकील जावेद खान आणि गणेश म्हसके यांनी टीझरमध्ये न्यायाधीश आणि वकिलांची खिल्ली उडवण्यात आली आहे तसेच त्यांचा अनादर करण्यात आला आहे असा आरोप करणारी याचिका दाखल केली आहे.
‘जॉली एलएलबी ३’चे कलाकार आणि निर्माते सर्जनशील स्वातंत्र्याचा नावाखाली कायदेशीर व्यवसायाची खिल्ली उडवत आहेत, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. या याचिकेची गंभीर दाखल घेत १२ वे कनिष्ठ दिवाणी न्यायाधीश जे. जी. पवार यांनी अभिनेते तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते यांना समन्स बजावला आहे व २८ ऑगस्ट रोजी या सर्वांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. Akshay Kumar
अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांनी वकिलाचा गणवेश घालून या चित्रपटाचे प्रमोशन केले आहे. त्यावरून देखील आता वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटातील वकील हे न्यायाधीशांना मामू म्हणून संबोधतात, हा न्यायव्यवस्थेचा अवमान आहे. असे वाजीद खान यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर ‘जॉली एलएलबी ३’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणीही याचिकाकर्त्यांनी केली आहे.
पुढे वाजीद खान यांनी, चित्रपटातील वकील न्यायालयात कौटुंबिक भांडण असल्याप्रमाणे वाद घालतांना दाखवले जात असल्याचं म्हटलं आहे. तसेच, चित्रपट म्हणून एक लिबर्टी असली तरीही यामुळे विधी क्षेत्राविषयी सामान्य जनतेच्या मनात चुकीचे समज निर्माण होऊ शकतात, असंही वाजीद यांनी म्हटलं आहे. Akshay Kumar
जॉली एलएलबी या चित्रपटाचे २ भाग अगोदरच प्रदर्शित झालेले आहेत. या चित्रपटाचा तिसरा भाग हा १९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार व अर्शद वारसी यांच्या मुख्य भूमिका आहेत. सोबतच अन्नू कपूर, अमृता राव, बोमन इराणी, संजय मिश्रा, सौरभ शुक्ला आणि हुमा कुरेशी यांच्याही प्रमुख भूमिका असणार आहेत. मात्र आता, चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदरच वादाच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे आता चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर जाण्याची देखील शक्यता आहे. तसेच, निर्मात्यांना आता न्यायालयाच्या दणक्यानंतर चित्रपटातील आक्षेपार्ह गोष्टी देखील बदलाव्या लागू शकतात.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App