विशेष प्रतिनिधी
मुंबई : महिला सक्षमीकरण आणि प्रशिक्षण या संदर्भात राष्ट्रीय महिला आयोगाने पुढाकार घेतला असून राष्ट्रीय महिला आयोगाचा महिला सक्षमीकरणासाठी मुंबईत दोन दिवस शक्ती संवाद आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतल्या हॉटेल ट्रायडेंट मध्ये या शक्ती संवादाचे उद्घाटन होणार आहे. या शक्ती संवादाची सविस्तर माहिती राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रीय महिला आयोगाने महिला सक्षमीकरणासाठी देशव्यापी मोहीम हाती घेतली असून विविध राज्यांमध्ये जाऊन महिलांसाठी तसेच संपूर्ण समाजाच्या जागृतीसाठी शक्ती संवादाचे आयोजन करत आहे. याद्वारे महिला सक्षमीकरण, प्रशिक्षण तसेच देशात महिलांच्या सुरक्षा, सक्षमीकरणाविषयी असलेल्या कायद्यांची माहिती देणे, प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रोत्साहन देणे, या संदर्भात व्यापक जनजागृती करणे, असे कार्यक्रम आयोजित करीत आहे. याच साखळीतील पुढचा कार्यक्रम 22 ऑगस्ट आणि 23 ऑगस्ट 2025 या दोन दिवशी मुंबईतल्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये आयोजित केला असून या शक्ती संवाद उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे उपस्थित राहतील. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर त्याचबरोबर अन्य राज्यांच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि अन्य पदाधिकारी या शक्ती संवादामध्ये सक्रिय सहभाग घेणार आहेत.
कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ आणि कायदेशीर प्रतिबंधात्मक उपाय योजना या संदर्भात राष्ट्रीय महिला आयोगाने तयार केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल.
या आधीचा शक्ती संवाद एप्रिल 2025 मध्ये अयोध्येत झाला होता. त्यानंतर हा शक्ती संवादाचा दुसरा उपक्रम मुंबईमध्ये होतो आहे. यापुढेही अन्य राज्यांमध्ये शक्ती संवादाचे कार्यक्रम होणार आहेत.
शक्ती संवादाची रूपरेषा
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App