विशेष प्रतिनिधी
पुणे : Devendra Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पुण्यात माध्यमांशी संवाद साधत असताना, विविध विषयांवर भाष्य केले. विशेष म्हणजे, बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीवर भाष्य करत त्यांनी ठाकरेंना टोला लगावला. ठाकरे बंधूंनी या निवडणुकीचे राजकीयकरण केले, त्यामुळे जनतेने त्यांना नाकारले, अशी टीका त्यांनी केली. तसेच संजय शिरसाट सिडको अध्यक्ष असताना मोठा घोटाळा झाल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. यावरही मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली.Devendra Fadnavis
ठाकरे बंधूंच्या राजकीयकरणाला जनतेचा नकार
बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीचे राजकीय करण करण्यात येऊ असे माझे मत होते. पण ठाकरेंनी त्याचे राजकीय करण केले. पतपेढीच्या निवडणुकीला शशांक राव आणि प्रसाद लाड उभे होते. दोघेही आमचेच आहेत. पण त्यांनी ठाकरें बंधू एकत्र, ठाकरे ब्रँड निवडून येणार, अशाप्रकारे त्यांनी राजकीय करण केले. ते लोकांना आवडलेले दिसत नाही. त्यामुळे त्यांना एकही जागा मिळालेली नाही. या निवडणुकीत तरी त्यांना लोकांनी नाकारल्याचे चित्र आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.Devendra Fadnavis
रोहित पवारांनी पुरावे द्यावे
रोहित पवार यांनी संजय शिरसाट यांच्या 5 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, रोहित पवारांनी पुरावे दिले पाहिजेत, अशी प्रतिक्रिया दिली. रोहित पवारांसारखील मंडळी रोज आरोप करत असतात. विना पुराव्याचे आरोप करणे योग्य नाही. पुराव्यानिशी आरोप केल्यास त्यावर परिणात्मक उत्तर मिळते. त्यांच्याकडे काय पुरावे आणि नेमके प्रकरण काय आहे? त्याबद्दल माहिती नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राज्यातील पूरस्थिती नियंत्रणात
राज्यातील पूरस्थितीबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, पूरस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आलेली आहे. काही भागात अजूनही पाऊस जोरात सुरू असून, आजही रेड अलर्ट आहे. आपत्ती व्यवस्थानपनाच्या संदर्भातील सर्वतोपरी काळजी घेण्यात आलेली आहे. इशारा पातळीच्यावर नद्या गेलेल्या आहेत, तिथे धरणातून विसर्ग वाढवून व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. वेगवेगळ्या राज्यांसोबत चर्चा सुरू असून, त्यांचेही सहकार्य मिळत आहे. आपल्या विनंतीप्रमाणे ते त्यांच्या धरणातील विसर्ग वाढवत आहेत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार?
पावसामुळे राज्यात शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावर शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार असा प्रश्न विचारला असता शक्य तितक्या कमी वेळेत मदत दिली जाईल, असे आश्वासन दिली. राज्यात 14 लाख एकर जमिनीवरील पिके पावसामुळे नष्ट झालेले आहेत. पंचनामे करून सगळ्यांना मदत केली जाईल. चार दिवसांत मदत देता येत नाही. मदत देण्याची एक पद्धत असते. एनडीआरएफमध्ये अशाप्रकारची मदत देण्यासाठी आधी पंचनामे करावे लागतात. त्या पंचनाम्यानंतर ती मदत देता येते. पंचनाम्यांचे आदेश देण्यात आले असून, ते पूर्ण झाल्यानंतर कमीत कमी वेळात मदत देता येईल. सरकारने कुणीही मागणी न करता यांची घोषणा केलेली आहे, असेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App