Agni-5 बीजिंग, शांघायही भारताच्या टप्यात, अग्नी-५ क्षेपणास्त्र चाचणी यशस्वी

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारताने मध्यम अंतराच्या बॅलेस्टिक मिसाइल अग्नी-५ ची आणखी एक यशस्वी चाचणी करून जगाचे लक्ष वेधले आहे. पाच हजार किमीपेक्षा जास्त मारक क्षमतेमुळे हे क्षेपणास्त्र पाकिस्तान आणि चीनसाठी धोक्याची घंटा मानले जात आहे. कारण ५,००० किमी रेंजमुळे बीजिंग, शांघायसह चीनमधील महत्त्वाची शहरे सहजपणे भारतीय क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात येतात. Agni-5

ओडिशातील चांदिपूर येथील इंटीग्रेटेड टेस्ट रेंज (ITR) केंद्रातून अग्नी-५ चे प्रक्षेपण करण्यात आले. या यशस्वी चाचणीनंतर भारत जगातील त्या काही मोजक्या देशांच्या पंक्तीत पोहोचला आहे ज्यांच्याकडे इंटरकॉन्टिनेंटल बॅलेस्टिक मिसाइल्स (ICBM) आणि MIRV तंत्रज्ञानाची दुहेरी क्षमता आहे. या चाचणीच्या आधीच पाकिस्तानमध्ये सावधगिरीचे वातावरण होते. इस्लामाबादस्थित स्ट्रॅटेजिक व्हिजन इन्स्टिट्यूट (SVI) या थिंक टँकने पाक सरकार आणि आर्मी चीफ असीम मुनीर यांना अग्नी-५ च्या संभाव्य चाचणीबद्दल इशारा दिला होता. त्यांच्या मते, भारताने जर हे यश मिळवले तर दक्षिण आशियातील सामरिक समतोल ढासळू शकतो. पाकिस्तानकडे सध्या शॉर्ट-रेंज आणि मिड-रेंज मिसाइल्स आहेत, पण ५,००० किमीपर्यंत मारक क्षमतेच्या क्षेपणास्त्रांशी त्यांची तुलना होत नाही.



अग्नी-५ चे तांत्रिक वैशिष्ट्ये :

  • मारक क्षमता : ५,००० किमीपेक्षा जास्त (अपग्रेडनंतर ७,५०० किमी पर्यंत वाढवण्याची योजना).
  • MIRV तंत्रज्ञान : (Multiple Independently Targetable Re-entry Vehicle) – एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर प्रहार करण्याची क्षमता.
  • वाहन क्षमता : अनेक प्रकारची अण्वस्त्रे व युद्धसामग्री वाहून नेऊ शकते.
  • विकासक संस्था : भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO).

हे क्षेपणास्त्र लांब पल्ल्याच्या सामरिक गरजा पूर्ण करण्यास सक्षम आहे. विशेष म्हणजे ते भारताच्या “मिनिमम डिटरन्स” धोरणाशी सुसंगत आहे, म्हणजेच भारत हल्ला करण्यासाठी नव्हे तर आक्रमण रोखण्यासाठी ही क्षमता मिळवाे.

गेल्या वर्षी भारताने ‘मिशन दिव्यास्त्र’ अंतर्गत अग्नी-५ ची पहिली MIRV चाचणी यशस्वी केली होती. हे तंत्रज्ञान जगातील फक्त काही शक्तींपाशीच आहे. यामध्ये अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि युनायटेड किंग्डम. आता भारतानेही या यादीत आपले नाव कोरले आहे. MIRV प्रणालीमुळे एकच क्षेपणास्त्र शत्रूच्या हवाई संरक्षण प्रणालीला चकवून अनेक ठिकाणी एकाचवेळी मारा करू शकते. यामुळे भारताची सामरिक ताकद अनेक पटींनी वाढली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशानंतर DRDO च्या शास्त्रज्ञांचे कौतुक करत म्हटले होते की, “भारताच्या सुरक्षेला अधिक सक्षम बनवणारे हे पाऊल आहे. स्वदेशी संशोधन व तंत्रज्ञानामुळे भारत आता सुपरपॉवर राष्ट्रांच्या बरोबरीने उभा आहे.”

Beijing, Shanghai also in India’s phase, Agni-5 missile test successful

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात