विशेष प्रतिनिधी
मुंबई : Thackeray brothers मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट- मनसे युतीची लिटमस टेस्ट मानल्या जात असलेल्या बेस्ट एम्प्लॉइज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत दाेन्ही ठाकरे बंधूंना माेठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या ‘उत्कर्ष’ पॅनलचा दारुण पराभव झाला. 21 पैकी एकही जागा मिळवता आलेली नाही. दुसरीकडे, शशांक राव यांच्या पॅनलने 14 जागा जिंकत एकहाती यश संपादन केले. महायुतीच्या पॅनलला 7 जागांवर समाधान मानावे लागले.Thackeray brothers
बेस्ट पतपेढीवरील ठाकरेंच्या शिवसेनेची नऊ वर्षांची सत्ता या पराभवाने संपुष्टात आली आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि मनसे एकत्र लढण्याचा विचार करत असताना, दोन्ही पक्षांसाठी हा निकाल मोठा धक्का मानला जात आहे. या पराभवामुळे ठाकरे बंधूंच्या युतीची चिंता वाढली असून आगामी काळात त्याचे राजकीय परिणाम हाेणार आहेत.Thackeray brothers
या निवडणुकीत शिवसेना (ठाकरे गट) प्रणित बेस्ट कामगार सेना आणि मनसे बेस्ट कामगार कर्मचारी सेना यांनी एकत्र येत ‘उत्कर्ष’ पॅनलची स्थापना केली होती. त्यांच्या विरोधात भाजपचे आमदार प्रसाद लाड, नितेश राणे आणि शिवसेना (शिंदे गट) चे किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे ‘सहकार समृद्धी’ पॅनल रिंगणात होते. तसेच, बेस्ट वर्कर्स युनियन पुरस्कृत शशांक राव पॅनलनेही जोरदार टक्कर दिली.
शशांक राव पॅनलने म्हटले आहे की, हा विजय म्हणजे बेस्ट कर्मचाऱ्यांनी युनियनने केलेल्या कामाला दिलेली खरी पोचपावती आहे.गेल्या अनेक वर्षांत शिवसेनेने बेस्टमध्ये जे खाजगीकरण आणले आणि कामगारविरोधी धोरणे राबवली, त्याबद्दलची कर्मचाऱ्यांची चीड या निकाला तून दिसून येते. म्हणूनच त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही.
भाजपचे नवनाथ बन म्हणाले की, संजू भौ जवाब दो! बेस्ट पतपेढी निवडणुकीत उबाठा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा दारूण पराभव झाला. मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी मुंबईकरांनी आपला कौल स्पष्टपणे दिला आहे. उबाठाचा एकही उमेदवार निवडून आला नाही.ही निवडणूक ईव्हीएमवर नाही तर बॅलेट पेपरवर झाली. म्हणजे नेहमीप्रमाणे “ मतचोरी, षड्यंत्र” असे खोटे रडगाणे गाण्याचा अधिकार आता संजय राऊतांना नाही.रोज माध्यमांसमोर येऊन लोकशाहीवर डोंगराएवढी भाषणे करणारे संजय राऊत आज मुंबईकरांच्या या लोकशाहीच्या निर्णयावर शिमगा करणार की तोंडात बोटं घालून बसणार? जवाब दो!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App