मुंबईत मोनो रेल अधांतरी अडकली; 2 तासानंतर काचा फोडून प्रवाशांची सुखरूप सुटका, चेंबूर ते भक्ती पार्क मार्गावरील घटना

Mumbai Monorail

वृत्तसंस्था

मुंबई : चेंबूर ते भक्ती मार्गादरम्यान एक मोनो रेल आज सायंकाळी 6.15 वाजताच्या सुमारास बंद पडली आणि एका बाजूला झुकली होती. सव्वातासाच्या प्रयत्नांनंतर प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. दोन-तीन ठिकाणच्या काचा फोडून या प्रवाशांना मोनो रेलमधून बाहेर काढण्यात आले आहे. Mumbai Monorail

मिळालेल्या माहितीनुसार, तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडल्याचे मोनो रेल प्रशासनाकडून सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत, तीन स्नोर्केल वाहनांच्या मदतीने अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू केले होते.

सव्वा तासाच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाकडून मोनो रेलच्या काचा फोडून आणि दरवाजा कापून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. तीन शिड्यांच्या मदतीने या प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. या सर्व प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. Mumbai Monorail

चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान धावणारी मोनोरेल म्हैसूर कॉलनी स्थानकाजवळ अचानक बंद पडल्याने प्रवाशी घाबरले होते. प्रवाशांनी आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 196 या क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर एक दुसरी मोनोरेल मदतीसाठी दाखल झाली. परंतु त्याचा उपयोग झाला नाही. त्यानंतर मुंबई अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत तीन स्नोर्केल वाहनांच्या साहाय्याने मदतकार्य सुरु केले.

मोनोरेलमधील एसी बंद, प्रवासी घामाघूम

मोनो रेल अधांतरी थांबल्यामुळे आतमध्ये असलेले एसी आणि दरवाजे दोन्ही बंद झाले होते. ज्यामुळे प्रवाशांची कुचंबणा झाली. प्रवाशी घामाघूम झाले, त्यांना श्वास घेण्यासही त्रास होत होता. आधीच लोकल सेवेच्या खोळंब्यामुळे त्रस्त असलेल्या मुंबईकरांना आता मोनो रेलमधील या बिघाडामुळे आणखी एका त्रासाला सामोरे जावे लागले आहे.

वीज पुरवठ्यातील समस्येमुळे मोनो रेल अडकली

म्हैसूर कॉलनी स्थानकाजवळील एका मोनोरेल ट्रेनला वीज पुरवठ्यात किरकोळ समस्या आली आहे. आमचे ऑपरेशन आणि देखभाल पथक आधीच घटनास्थळी पोहोचले आहेत आणि ते लवकर सोडवण्यासाठी काम करत आहेत. सध्या, वडाळा आणि चेंबूर दरम्यानच्या सेवा एकाच मार्गावर सुरळीत सुरू आहेत. तुमच्या संयमाबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो आणि तुमची सुरक्षितता आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे याची खात्री देतो. खात्री बाळगा, सामान्य सेवा लवकरात लवकर पूर्ववत केल्या जातील, असे एमएमआरडीएने सांगितले होते.

Mumbai Monorail Stuck Passengers Rescued

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात