नाशिक : ही पहा काँग्रेसची कृतघ्नता; सर्वोच्च नेत्यांना वाचविण्याचे निर्णय देणाऱ्या न्यायमूर्तींना करणाऱ्या निवडणुकीत उभा केलंया!!, असं म्हणायची वेळ INDI आघाडीच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार निवडीवरून आली. काँग्रेस सकट सगळ्या विरोधकांच्या आघाडीने सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार जाहीर केले. त्यानंतर त्यांच्या परफॉर्मन्सचा शोध माध्यमांनी आणि काँग्रेसच्या विरोधकांनी घेतला, त्यावेळी काही धक्कादायक बाबी समोर आल्या. बी. सुदर्शन रेड्डी यांचा न्यायमूर्ती म्हणून वेगळा इतिहास समोर आला. त्यावरून भाजपने काँग्रेस आणि रेड्डी यांच्यावर टीकास्त्र सोडले. Congress
– सुदर्शन रेड्डींचे वादग्रस्त निकाल
हे तेच बी. सुदर्शन रेड्डी आहेत, ज्यांनी भोपाळ गॅस दुर्घटनेची केस reopen करायला नकार दिला. सुप्रीम कोर्टाच्या ज्या 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने भोपाळ गॅस दुर्घटनेची केस reopen करायला नकार दिला, त्या 5 न्यायमूर्तींमध्ये बी. सुदर्शन रेड्डी यांचा समावेश होता. ती केस reopen झाली असती, तर त्याची छिटे राजीव गांधी आणि युनियन कार्बाइडचा अध्यक्ष वॉरन अँडरसन यांच्यावर उडाली असती. त्यांचा दोष सिद्ध झाला असता. काँग्रेसवर कायमचे बालंट आले असते. भोपाळ गॅस दुर्घटना झाल्याबरोबर वॉरन अँडरसन याला भारतातून पळून जायला राजीव गांधींच्या सरकारने मदत केल्याचा आरोप झाला होता. त्याला भारतात परत आणून त्याच्याविरुद्ध खटला दाखल करण्याचा वेगवेगळ्या सरकारांनी प्रयत्न केला, पण सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयामुळे भोपाळ गॅस दुर्घटनेची केस reopen होऊ शकली नाही. त्यामुळे राजीव गांधी आणि वॉरन अँडरसन हे दोघेही “बचावले”.
त्याचबरोबर छत्तीसगडच्या सरकारने नक्षलवादा विरोधात सकारात्मक पाऊल म्हणून उचललेल्या सलवा जुडूमच्या विरोधात बी. सुदर्शन रेड्डी यांनी निकाल दिला होता.
भोपाळ गॅस दुर्घटना आणि सलवा जुडूम या दोन केसच्या आधारे भाजपने बी. सुदर्शन रेड्डी यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला. काँग्रेसची देशद्रोही मनोवृत्ती असल्याची टीका केली. राजकीय टीका म्हणून काही अंशी ती बरोबर असली, तरी काँग्रेसच्या कृतघ्नतेची भाजपच्या नेत्यांना पुरेशी कल्पना आलेली नाही, हेच यातून दिसून आले.
– काँग्रेसची कृतघ्नता
बी. सुदर्शन रेड्डी यांना काँग्रेसने अशा निवडणुकीत उभे केले, ज्या निवडणुकीत संख्याबळाच्या आधारे त्यांचा पराभव होणे अटळ आहे. मागच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत काँग्रेसने जगदीप धनखड यांच्या विरोधात मार्गारेट अल्वा यांना उभे केले होते. पण त्यांचा पराभव झाला होता. काँग्रेस त्यांना निवडून आणू शकली नव्हती. या निवडणुकीतही काँग्रेसकडे आणि विरोधकांकडे पुरेसे संख्याबळ नाही. उगाच तत्त्वज्ञानाच्या बाता मारून त्यांनी बी सुदर्शन रेड्डी यांना निवडणुकीच्या घोड्यावर बसविले आहे. त्यांचा पराभव अटळ आहे.
हेच जर काँग्रेसकडे पुरेसे संख्याबळ असते, आपण देऊ तो उमेदवार निवडून येण्याची शक्यता असती, तर काँग्रेसने आणि विरोधकांनी राजकारण बाह्य व्यक्तीची उमेदवारीसाठी निवड तरी केली असती का??, हा खरा सवाल आहे. आणि त्याचे उत्तर थेट नकारार्थी आहे. काँग्रेस आणि विरोधकांचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता असती, तर बी. सुदर्शन रेड्डी यांच्या नावाचा विचारही झाला नसता. त्या उलट काँग्रेसच्या एखाद्या ज्येष्ठ नेत्याचा, विशेषत: सोनिया, राहुल आणि प्रियांका यांच्या निकटवर्ती नेत्याचीच उपराष्ट्रपती पदावर वर्णी लागली असती. त्यामुळे बी. सुदर्शन रेड्डी यांचा न्यायालयीन इतिहास काही असला आणि भाजपने त्यावर टीका केली असली, तरी काँग्रेसने पराभूत होणाऱ्या निवडणुकीत त्यांना उभे करून कृतघ्नताच दाखविली आहे. या बाबीकडे भाजपच्या नेत्यांनी दुर्लक्ष केले असले, तरी आपण दुर्लक्ष करायचे कारण नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App