CSDS’ Sanjeev Kumar : खाेट्या आकडेवारीमुळे काॅंग्रेसवर ताेंडावर पडण्याची वेळ, सीएसडीएसचे संजीव कुमार यांनाही मागावी लागली माफी

CSDS' Sanjeev Kumar

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : CSDS’ Sanjeev Kumar राजकारणात आकडेवारी ही सर्वात धारदार शस्त्र असते. पण तीच आकडेवारी चुकीची ठरली तर? काँग्रेस प्रवक्ते पवन खेऱा आणि सीएसडीएसचे संजय कुमार यांना या प्रश्नाचे उत्तर मिळाले. सहा महिन्यांत मतदार यादीत तब्बल ४० टक्के घटवाढ झाली असल्याचा त्यांचा दावा ४८ तासांत कोसळला आणि माफी मागण्याची वेळ आली.CSDS’ Sanjeev Kumar

कथित मतदारयादीतील घाेटाळ्यावरून निवडणूक आयाेगावर मतचाेरीचा काॅंग्रेसचा आराेप फाेल ठरला आहे. ‘लोकनीति-CSDS’ कडून घेतलेल्या आकड्यांवरून काॅंग्रेसने आराेप केला हाेता. मात्र, सीएसडीएसचे संचालक संजय कुमार यांनी १७ ऑगस्ट रोजी पोस्ट केलेली पाेस्ट डिलीट करत जाहीर माफी मागितल्याने काॅंग्रेसवर ताेंडावर पडली आहे.CSDS’ Sanjeev Kumar

१८ ऑगस्ट रोजी काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेऱा यांनी ‘X’ वर एक ग्राफिक पोस्ट करून भारत निवडणूक आयोगाच्या (ECI) कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले हाेते. त्यांनी दावा केला हाेता की २०२४ च्या लोकसभा निवडणुका आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुका या सहा महिन्यांच्या कालावधीत रामटेक व देवळाली मतदारसंघांत तब्बल ४० टक्के मतदार वगळले गेले. नाशिक पश्चिम व हिंगणा या मतदारसंघांत ४५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. ही आकडेवारी ‘लोकनीति-सीएसडीएस’ कडून घेतल्याचे सांगण्यात आले. हे आकडे सर्वप्रथम सीएसडीएसचे संचालक संजय कुमार यांनी १७ ऑगस्ट रोजी पोस्ट केले होते. त्याच आकडेवारीवरून काँग्रेसने राजकीय हल्ला चढवला. पण पुढील अवघ्या ४८ तासांत हे दावे कोसळले आणि संजय कुमार यांना जाहीर माफी मागावी लागली.CSDS’ Sanjeev Kumar



 

संजय कुमार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये नाशिक पश्चिम व हिंगणा येथील मतदारसंख्या प्रचंड वाढल्याचा आरोप केला होता. उदाहरणार्थ, नाशिक पश्चिममध्ये लोकसभा यादीत ३,२८,०५३ मतदार तर विधानसभा यादीत ४,८३,४५९ मतदार असल्याचे त्यांनी दाखवले. यावरून तब्बल ४७ टक्के वाढ दाखवण्यात आली. हेच आकडे पवन खेऱा आणि इतर काँग्रेस नेत्यांनी पुढे रेटले.

परंतु १९ ऑगस्ट रोजी संजय कुमार यांनी पोस्ट डिलीट करून जाहीर माफी मागितली. त्यांनी मान्य केले की त्यांच्या “डेटा टीमने ही चूक केली त्यामुळे आकडेवारी चुकीची सादर झाली. या चुकीमागे काेणताही हेतू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले, परंतु तोपर्यंत चुकीचे ग्राफिक्स व दावे मोठ्या प्रमाणावर पसरले होते.

वास्तविक नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणूक यादीत ४,५६,३१९ तर विधानसभा यादीत ४,८३,७१९ मतदार. वाढ फक्त २७,४०० (सुमारे ६ टक्के) झाली हाेती. हिंगणा विधानसभा मतदारसंघशत लोकसभा यादीत ४,२४,४५४ तर विधानसभा यादीत ४,५०,४३९ मतदार हाेते. म्हणजे केवळ २५,२९८ (सुमारे ६ टक्के) मतदार वाढले.

रामटेक मतदारसंघात लोकसभा यादीत २,७६,८२७ तर विधानसभा यादीत २,८७,३०१ मतदार हाेते. वाढ १०,४७४ (३.८ टक्के) हाेती.
देवळालीमध्ये लोकसभा यादीत २,७७,६०० तर विधानसभा यादीत २,८८,८१६ मतदार. वाढ ११,२१६ (सुमारे ४ टक्के). यामुळे खेऱा यांनी म्हटलेले ४० टक्के घट आणि ४५ टक्के वाढ हे आकडे पूर्णपणे दिशाभूल करणारे असल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणानंतर भाजपने सीएसडीएसवर जोरदार हल्ला चढवला. पक्षाच्या आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी सीएसडीएसला केवळ संशोधन संस्था नसून “नॅरेटिव्ह बिल्डर” म्हटले. त्यांनी विदेशी निधीचा मुद्दा उपस्थित करत, या संस्थेला विविध पाश्चात्य फाउंडेशन्सकडून निधी मिळाल्याचे सांगितले. हा निधी तटस्थ नसून भारतात विभाजन निर्माण करण्याच्या राजकीय अजेंडाशी जोडलेला असल्याचा आरोप त्यांनी केला.

सीएसडीएस च्या सर्व्हेमध्ये हिंदू समाजाला जातीनिहाय विभागले जाते, तर मुस्लिम समाजाला एकसंध म्हणून दाखवले जाते. यामुळे निवडणुकांदरम्यान काँग्रेसला अनुकूल वातावरण तयार होते.

Time to attack Congress due to fake statistics, CSDS’ Sanjeev Kumar also had to apologize

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात