विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : INDI आघाडीतल्या नेत्यांना पराभवाची भीती म्हणून सुप्रीम कोर्टाच्या माझी न्यायमूर्तींच्या गळ्यात घातली उपराष्ट्रपदाची उमेदवारी!!, असे राजकारण आज दिल्लीत घडले.
भाजप प्रणित सत्ताधारी NDA ने महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी INDI आघाडीच्या नेत्यांची बैठक काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी झाली. तिथे सर्वांनी मिळून सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांच्या गळ्यात उपराष्ट्रपती कराच्या निवडणुकीची उमेदवारी घातली.
मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह सगळ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांनी रेड्डी यांच्या नावाला दुजोरा दिला. बी सुदर्शन रेड्डी हे तेलंगणा राज्यातले रंग रेड्डी जिल्ह्यातले मूळचे रहिवासी. त्यांनी आंध्र हायकोर्टातून वकिली कारकीर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांची गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदी नियुक्ती झाली. त्याचबरोबर ते गोव्याचे पहिले लोकायुक्त देखील होते. सुप्रीम कोर्टात त्यांनी तीन वर्षे न्यायमूर्ती म्हणून काम पाहिले.
सत्ताधारी भाजप आघाडीने सी. पी. राधाकृष्णन दक्षिणेतल्या नेत्याची उपराष्ट्रपती पदासाठी निवड केल्यानंतर विरोधकांपुढे उमेदवारीचा पेच होता. तामिळनाडूतल्याच दुसऱ्या नेत्याला राधाकृष्णन यांच्याविरुद्ध उभे करावे, असे सुरुवातीला घाटत होते. त्यामुळे द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे खासदार तिरुपती शिवा यांचे नाव पुढे आले होते. परंतु, संख्याबळाच्या आधारे विरोधकांच्या उमेदवाराचा पराभव होणार हे निश्चित असल्याने कुठल्याच विरोधी पक्षांनी आपल्या राजकीय नेत्याचा “गेम” करायचे नाही असे ठरविले. काँग्रेस आपला उमेदवार देणारच नव्हती.
कारण आधीच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत जगदीप धनखड यांच्या विरोधात काँग्रेसने मार्गारेठ अल्वा यांना उतरविले होते, पण अर्थातच त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे त्याच्या निवडणुकीत प्रादेशिक पक्षांचा कुणी उमेदवार उतरवावा असा काँग्रेसचा विचार होता. परंतु, पराभवाच्या खात्रीमुळे प्रादेशिक पक्षांनी देखील काँग्रेसचा विचार नाकारला. त्यामुळे राजकारणाच्या बाहेर असलेल्या व्यक्तीचा उमेदवार म्हणून विचार सुरू झाला. त्यामध्ये बी सुदर्शन रेड्डी यांचे नाव सगळ्या विरोधकांनी निश्चित केले.
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी झालेल्या बैठकीला शरद पवार यांच्यासह INDI आघाडीतले अनेक नेते उपस्थित होते. सगळ्या विरोधकांनी दक्षिणेतलाच उमेदवार दिल्याने उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत दक्षिणेतल्या दोन दिग्गजांचा सामना होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App