आज एकाच दिवशी पुतिन यांचा मोदींना फोन कॉल; चीनचे परराष्ट्र मंत्री दिल्लीत येऊन भारतीय परराष्ट्र मंत्र्यांना भेटले!!

RIC working

नाशिक : ट्रम्प तात्यांची बडबड आणि रशिया – युक्रेन यांच्यातल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक घडामोडींना उत आला असताना आज एकाच दिवशी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्वतःहून फोन कॉल केला आणि त्याच दिवशी चीनचे परराष्ट्रमंत्री दिल्लीत येऊन भारतीय परराष्ट्र मंत्र्यांना भेटले. या दोन महत्त्वाच्या घटनांचा राजकीय योगायोग राजधानीत घडल्या.RIC working relationship on Fastrack in New Delhi

भारत रशियाकडून तेल घेतो म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर जादा टेरिफ लादायची घोषणा केल्यानंतर भारत आणि अमेरिका यांच्यातल्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला. या तणावपूर्ण संबंधांची चर्चा जगभरात असताना रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर मध्यस्थी करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतिन यांच्याशी अलास्का मध्ये चर्चा केली. दोघांच्या चर्चेतून फारसा ठोस निष्कर्ष बाहेर आला नाही किंवा करारही झाला नाही, पण रशिया आणि युक्रेन यांचे युद्ध थांबण्याचा आशेचा किरण निर्माण झाला.



 पुतिन यांचा मोदींना फोन कॉल

या पार्श्वभूमीवर व्लादीमिर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन कॉल करून ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची सविस्तर माहिती दिली. अमेरिकेने जरी भारताविरुद्ध टेलिफ लादायची घोषणा केली असली, तरी रशिया भारताची साथ सोडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. दोन्ही नेत्यांमध्ये मैत्रीपूर्ण चर्चा झाल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरून दिली.

वांग यी भारत दौऱ्यावर

त्याचवेळी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी भारत दौऱ्यावर आले. त्यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी द्विपक्षीय वाटाघाटी केल्या. भारत आणि चीन यांच्यातल्या राजकीय मतभेदांचे रूपांतर राजकीय वैरामध्ये होता कामा नये, असे जयशंकर यांनी वांग यी यांना स्पष्ट शब्दांमध्ये बजावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबरमध्ये चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर चिनी परराष्ट्र मंत्र्यांची दिल्ली भेट मोदी आणि सी जिनपिंग यांच्यातल्या शिखर परिषदेतल्या वाटाघाटींचा अजेंडा ठरविण्यासाठी होती.

 RIC working relationship

ट्रम्प यांनी वैयक्तिक विशिष्ट महत्त्वाकांक्षेपोटी भारताविरुद्ध आर्थिक आणि राजकीय वैर आरंभले. भारताचे अमेरिकेबरोबरचे संबंध वाढत चालले असताना ट्रम्प यांनी अचानक त्यामध्ये खोडा घालण्यासारखे एकतर्फी निर्णय घेतले. भारत + अमेरिका + जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या QUAD संघटनेचे महत्त्व वाढविण्याच्या ऐवजी BRICS संघटना मोडीत काढायची महत्त्वाकांक्षा धरली. ज्यामुळे एकाच वेळी भारत + चीन आणि रशिया हे तिन्ही देश दुखावले गेले. वास्तविक भारताला हाताशी धरून चीनला काटशह देण्याची उत्तम स्थिती प्राप्त झाली असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी केवळ आतातायी व्यापारी उद्देशाने भारताबरोबरच्या सामारिक संबंधांना सुद्धा धक्का दिला. पण यातून भारताचे नुकसान होण्यापेक्षा अमेरिकेचे नुकसान होईल, याची स्पष्ट जाणीव अमेरिकेतल्या धोरणकर्त्यांनी करून दिल्यानंतरही ट्रम्प मागे हटण्याच्या मूडमध्ये आले नाहीत. त्यांनी त्यांची बडबड तशीच सुरू ठेवली. त्याचवेळी पाकिस्तानचा लष्कर प्रमुख असीम मुनीर याला आपल्या जवळ करून वैयक्तिक आर्थिक हितसंबंध पुढे रेटले.

या पार्श्वभूमीवर भारताने संयमी परंतु ठाम भूमिका घेऊन ट्रम्प यांची बडबड आणि त्यांची आतातायी कृती दोन्ही नाकारले. रशिया बरोबरची मैत्री अधिक दृढ केली तर चीन बरोबरची working relationship अधिक वाढवायचा प्रयत्न चालविला. पुतिन यांनी मोदींना केलेला फोन कॉल आणि चिनी परराष्ट्र मंत्र्यांनी भारतीय परराष्ट्र मंत्र्यांशी केलेल्या वाटाघाटी या दोन एकाच दिवशीच्या घडामोडी भारताचे विशिष्ट जागतिक महत्त्व अधोरेखित करणारे ठरले.

RIC working relationship on Fastrack in New Delhi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात