जगदीप धनखड यांना घालवून बसले; आता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश्वर कुमारांच्या मागे लागले, पण हाती काय लागण्याची चिन्हे??

election commissioner

जगदीप धनखड यांना घालवून बसले; आता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश्वर कुमार यांच्या मागे लागले, पण हाती काय लागण्याची चिन्हे??, असा सवाल विचारण्याची वेळ राहुल गांधींच्या नादी लागलेल्या विरोधकांच्या राजकीय वर्तणुकीतून समोर आली.

राजीनामा द्यावा लागलेले उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या बाबतीत विरोधकांनी आणि खुद्द त्यांनी खेळलेले राजकारण धनखड यांच्या अंगाशी आले. भ्रष्ट न्यायाधीश आणि वकील यांना वाचविण्याचे राजकारण खेळण्याच्या नादात जगदीश धनखड आणि राहुल गांधींच्या नादी लागलेले सगळे विरोधक कधी थेट मोदींच्या विरोधात “गेमा” करायला लागले आणि त्या गेमा त्यांच्यावरच कशा उलटल्या, हे काही कळायच्या आतच जगदीप धनखड यांचाच “गेम” झाला. विरोधक आणि जगदीप धनखड यांच्या चाललेल्या “गेमा” पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वेळीच ओळखल्या. विरोधकांना हाताशी धरून धनखड सरकारला अडचणीत आणताहेत हे पाहून प्रत्यक्ष अडचण निर्माण होण्यापूर्वीच मोदींनी धडपड यांची “विकेट” काढली. त्यामुळे विरोधकांच्या हाती तेल गेले, तूप गेले आणि हाती धुपाटणे राहिले असे म्हणायचे वेळ आली.

जगदीश धनकड यांच्या उपराष्ट्रपती पदाचा किंबहुना राज्यसभेच्या सभापती पदाचा विरोधकांना हवा तसा वापर करून मोदी सरकारला दीर्घकाळ अडचणीत आणायच्या खेळ्या बुद्धिमान विरोधकांना खेळता आल्या असत्या. पण विरोधकांनी राहुल गांधींच्या नादी लागून ती संधी गमावली.

जगदीप धनखड आणि विरोधकांचा डाव अतिशय थोडक्यात खेळीमध्ये मोदींनी उधळून लावला. जगदीप धनखड आणि सगळे विरोधक जरा बुद्धिमत्तेने राजकारणाच्या पटावरच्या खेळ्या करत राहिले असते, तर जगदीप धनखड यांची सहजासहजी “विकेट” काढणे पंतप्रधान मोदींच्या सरकारला जमले नसते, पण धनखड आणि विरोधक उथळपणे राजकीय खेळ्या केल्या म्हणून मोदींच्या सरकारला धनखड यांची “विकेट” सहज काढता आली आणि विरोधकांना त्या विरोधात कुठली बोंब इमारत आली नाही.



विरोधक आणि धनखड यांच्या राजकारणाचा परिपाक म्हणून धनखड यांची “विकेट” गमावली गेली. नेमके तसेच आता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश्वर कुमार यांच्या बाबतीत घडताना दिसत आहे. किंबहुना विरोधक तेच चुकीचे राजकारण खेळताना दिसत आहेत. ज्ञानेश्वर कुमार यांच्या विरोधात impichment motion आणायचा विरोधकांचा विचार हा ज्ञानेश्वर कुमार यांची “विकेट” काढण्याच्या ऐवजी विरोधकांची “विकेट” काढण्याचा प्रकार ठरण्याची शक्यता आहे. एकतर ज्ञानेश्वर कुमारांनी काल पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावरचे सगळे आरोप कायद्याच्या चौकटीत आणि कायद्याचा हवाला देऊन खोडून काढले. मतदान प्रक्रिया आणि मतदार यादी निर्मिती या दोन भिन्न बाबी वेगवेगळ्या कायद्यानुसार अनुसरल्या जातात, हे त्यांनी स्पष्ट करून सांगितले, तरी देखील राहुल गांधींनी जुन्याच पद्धतीने निवडणूक आयोगावर आक्षेप घेऊन मतदान चोरीच्या बाता जुन्याच पद्धतीने मारल्या. बिहारमधल्या मतदार अधिकारी यात्रेत त्यांनी जोरदार भाषण ठोकून प्रतिज्ञा पत्राचा मुद्दा उतरून काढला. त्यासाठी अनुराग ठाकूर या भाजपच्या नेत्याला त्यांनी डिवचले. त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र मागत नाही आणि माझ्याकडून मागतात, अशा टोमणा मारून प्रतिज्ञा पत्राच्या कचाट्यातून आपली मान सोडवण्याचा प्रयत्न केला.

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात impichment motion

पण त्या पलीकडे जाऊन राहुल गांधींच्या नादी लागलेल्या विरोधकांनी थेट ज्ञानेश्वर कुमार यांनाच पदावरून घालवण्याची तयारी चालवली. त्यांच्याविरुद्ध impichment motion मांडण्याची तयारी केली. वास्तविक राहुल गांधी आणि विरोधकांचे मतदान चोरीचे आरोप हे लोकसभा आणि विधानसभा निवडणूक दरम्यानचे आहेत, ज्यावेळी राजीव कुमार हे मुख्य निवडणूक आयुक्त होते. पण मुख्य निवडणूक आयुक्त या पदाचा घटनात्मक दर्जा लक्षात घेतात त्या पदाविरुद्धच impichment motion आणता येते ते आता ज्ञानेश्वर कुमार यांना face करावे लागणार आहे, पण ही सहज घडून येणारी प्रक्रिया नाही. त्यासाठी लोकसभा आणि राज्यसभेत विशिष्ट पद्धतीचे बहुमत लागते आणि आरोपांची देखील तेवढीच घटनात्मक तीव्रता लागते, अन्यथा impichment motion मोशन उलटून विरोधकांनाच त्याची जबर किंमत मोजावी लागते.

काय घडेल??

ज्ञानेश्वर कुमार यांच्यावरच्या बाबतीत तेच घडण्याची शक्यता आहे. कारण विरोधकांना त्यातून जुनीच वातावरण निर्मिती करण्यापलीकडे हाती काही लागण्याची शक्यता नाही. विरोधकांच्या हाती बहुमत नाही. ज्ञानेश्वर कुमार यांना ते पदावरून हटवू शकत नाहीत. आपल्या अनुकूल असणारी व्यक्ती मुख्य निवडणूक आयुक्त पदावर आणून बसवू शकत नाहीत. कारण विरोधकांना तसा घटनात्मक अधिकार नाही. आणि विरोधकांना तसा अधिकार असता, तरी तो politically correct वापरायची राहुल गांधींची क्षमता नाही. कारण राहुल गांधींची तशी क्षमता असती, तर जगदीप धनखड यांच्या राज्यसभा सभापती पदाचा वापर चतुराईने करून राहुल गांधी मोदी सरकारला राज्यसभेत वारंवार अडचणीत आणू शकले असते. मोदी सरकारला कायद्याच्या कचाट्यात अडकवू शकले असते. मोदी सरकारला जगदीप धनखड यांची “विकेट” सहजासहजी करता आली नसती. राहुल गांधी यातले काहीच घडवू शकले नाहीत. कारण विरोधी पक्षनेते पद politically correct वापरायची त्यांची क्षमता नाही. ते ज्ञानेश्वर कुमार यांना मुख्य निवडणूक आयुक्त पदावरून हटवू शकणार नाहीत.

Opposition Mulling to bring impeachment motion against chief election commissioner

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात