विशेष प्रतिनिधी
पुणे : Actress Jyoti Chandekar मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे शनिवारी (१६ ऑगस्ट) दुःखद निधन झाले. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना दुपारी चार वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी अकरा वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या जाण्याने संपूर्ण कलाविश्वात हळहळ व्यक्त होत आहे. ज्योती चांदेकर या सुप्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या आई होत.Actress Jyoti Chandekar
ज्योती चांदेकर सध्या स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग…’ मध्ये काम करत होत्या. गेल्या वर्षी मालिकेच्या शूटिंगदरम्यान त्या आजारी पडल्या होत्या आणि त्यांच्या शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी झाल्याने तब्येत खालावली होती. जवळपास दोन महिने विश्रांती घेतल्यानंतर त्या पुन्हा नव्या जोमाने कामावर परतल्या होत्या. या मालिकेतून त्यांनी अनेक गोड आठवणी चाहत्यांना दिल्या होत्या. मात्र, यानंतर पुन्हा प्रकृती ढासळली आणि अखेर त्या कायमच्या दूर गेल्या. ज्योती चांदेकर यांना मानाचा बालगंधर्व जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या अभिनय क्षेत्रातील कामगिरीसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता.Actress Jyoti Chandekar
हिंदी सिनेमातील छोट्या भूमिकेतून करिअरला सुरुवात
ज्योती चांदेकर यांनी हिंदी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. 1969 मध्ये एका सिनेमाच्या शूटिंगला भेट दिली असताना, दिग्दर्शकांनी त्यांना छोट्या भूमिकेसाठी संधी दिली आणि तेथूनच त्यांचा अभिनय प्रवास सुरू झाला. पुढे रंगभूमीवरही त्यांचे योगदान मोठे राहिले. ‘सुंदर मी होणार’ या नाटकाने त्यांच्या कारकिर्दीला गती मिळाली आणि त्यानंतर त्यांनी एकापाठोपाठ एक नाटकं आणि चित्रपट गाजवले.
ज्योत चांदेकर यांनी ‘तिचा उंबरठा’, ‘ढोलकी’, ‘सुखांत’, ‘मी सिंधुताई सकपाळ’, ‘फुलवात’, ‘देवा’, ‘श्यामची आई’ अशा चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर, दूरदर्शनवर त्यांनी ‘छत्रीवाली’, ‘तू सौभाग्यवती हो’ अशा मालिकांमधूनही प्रेक्षकांची मने जिंकली.
दोन चित्रपटांत मायलेकींचे सोबत काम
ज्योती चांदेकर आणि तेजस्विनी पंडित या मायलेकीने तिचा उंबरठा आणि मी सिंधुताई सपकाळ या चित्रपटामध्ये एकत्र काम केले आहे. मी सिंधुताई सपकाळ चित्रपटात दोघींनी सिंधुताईंच्या आयुष्यातील दोन विविध पर्वातील भूमिका साकारल्या. या दोघींचे त्यांच्याभूमिकांसाठी खूप कौतुक झाले होते. तसेच त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App