Pranjal Khewalkar : निर्वस्त्र फोटो आणि व्हिडिओ काढल्याने महिलेची पोलिसांत तक्रार; खडसेंचे जावई खेवलकरांविरुद्ध पुण्यात आणखी 1 गुन्हा दाखल

Pranjal Khewalkar

विशेष प्रतिनिधी

पुणे : Pranjal Khewalkar  पुणे शहरातील खराडी येथील ड्रग्ज पार्टी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल मनीष खेवलकर याच्याविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात महिलेचे नकळत व्हिडिओ काढल्याने आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सायबर पोलिस ठाण्यात एका महिलेने डॉ.खेवलकर यांच्या विरोधात तक्रार दिली.Pranjal Khewalkar

खराडीतील एका हॉटेलमध्ये २५ जुलै रोजी झालेल्या पार्टीवर गुन्हे शाखेने छापा टाकला. याप्रकरणी प्रांजल खेवलकर, निखिल जेठानंद पोपटाणी, समीर फकीर महंमद सय्यद, सचिन सोमाजी भोंबे, श्रीपाद मोहन यादव, ईशा देवज्योत सिंग, प्राची गोपाल शर्मा यांना अटक करण्यात आली.Pranjal Khewalkar



महिला म्हणाली, खेवलकरने फोटो, व्हिडिओही काढले

सन २०२२ ते जून २०२५ या कालावधीत डॉ. खेवलकर यांनी वेगवेगळ्या हॉटेलमध्ये बोलावून तक्रारदार महिलेचे निर्वस्त्र अवस्थेतील छायाचित्रे काढली. संमती नसताना छायाचित्रे, ऑडिओज, व्हिडिओज, फोटोज काढण्यात आले. या छायाचित्रांचा गैरवापर केला जाण्याची शक्यता असल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. भविष्यात त्याचा गैरवापर करण्याचा प्रांजल खेवलकर यांचा उद्देश होता, अशी फिर्याद आहे.

New Case Against Eknath Khadse Son in Law Pranjal Khewalkar

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात