Guardian Minister : आठ महिने झाले ; पालकमंत्रीपदाचा वाद सुटता सुटेना !

Guardian Minsiter

विशेष प्रतिनिधी

नाशिक : राज्यात सरकार स्थापन होऊन ८ महिने झाले. मात्र नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा वाद अजूनही तसाच आहे. हा वाद आता स्वातंत्र्य दिनानिमित्त पुन्हा एकदा उफाळून आला आहे. गिरीश महाजन आणि छगन भुजबळ यांनी केलेल्या सूचक वक्तव्यांमुळे, पालकमंत्रीपदाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. Guardian Minister

जानेवारी महिन्यात सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर करण्यात आले होते. परंतु ४८ तासांतच नाशिक आणि रायगड जिल्ह्यातील पालकमंत्रीपदांच्या नियुक्तीवर स्थगिती आणली गेली. त्यामुळे या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य दिनाला ध्वजारोहण कोण करणार? याकडे सगळ्यांचे लक्ष होते. अखेर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी तो मान मिळवला.

परंतु याप्रसंगी राज्याचे अन्न व नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केलेले वक्तव्य चर्चेचा विषय ठरते आहे. छगन भुजबळ यांनी नाशिक जरी सर्वांनाच आवडत असले तरी मतदारसंघाकडेही लक्ष दिलं पाहिजे असं म्हटलं. जळगावकडे देखील दुर्लक्ष व्हायला नको, असा टोला त्यांनी गिरीश महाजन यांना लगावला. Guardian Minister

यावर मंत्री गिरीश महाजन यांनी, पालकमंत्री कोण? यावर फार चर्चा होऊ नये असं म्हटलं. आपण हळूहळू झेंडावंदनापर्यंत पोहोचलो आहोत. झेंडावंदन तर मी केले ना? यापुढचा मार्गही तसच काढू, अशी सूचक प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली. मात्र सध्या असे राजकीय अडचणीचे प्रश्न मला विचारू नका, असंही ते म्हणाले.

इतकंच नाही तर, मी कधीही पालकमंत्री पदाची मागणी केली नाही. एखाद्या मागणीसाठी अडून बसणे किंवा आंदोलन करणे, असे प्रकार मी कधीही केलेले नाही. पक्ष देईल आणि पक्ष सांगेल तसे काम मी करत आलो आहे, असं महाजन म्हणाले. नाशिकच्या पालकमंत्रीपदाची बरीच चर्चा होतेय, याबाबत राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बसून मार्ग काढतीलच. ते जो काही मार्ग काढतील तो आम्हाला मान्य असेल, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. Guardian Minister

नाशिक आणि रायगडला अजूनही पालकमंत्री का मिळत नाही?

जानेवारीमध्ये पालकमंत्रीपदांच्या घोषणेनंतर ४८ तासांच्या आतच गिरीश महाजन आणि अदिती तटकरे यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली होती. मात्र या सगळ्या प्रकाराला आता सहा ते सात महिने उलटून गेलेले आहेत. तरीही नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटत नाहीये. Guardian Minister

पालकमंत्री पद कोणाकडे जाणार यावरून महायुतीमध्ये असणारे अंतर्गत वाद व नाराजी याआधीही माध्यमांसमोर आलेली आहे. मात्र आता इतके महिने होऊनही हा प्रश्न का सुटत नाही?

It’s been eight months; the Guardian Minister post dispute remains unresolved!

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात