विशेष प्रतिनिधी
नाशिक : Girish Mahajan भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधत अनेक मुद्यांवर भाष्य केले आहे. तसेच ठाकरे बंधू एकत्र येत मराठी मतांची वज्रमूठ बांधणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत, यावर निवडणुका जवळ आल्या की मराठी मराठीचा नारा लावायचा आणि मराठी मते काय आमची नाहीत का? असा सवाल उपस्थित करत टोला लगावला आहे.Girish Mahajan
गिरीश महाजन म्हणाले, विकास करायचा असेल तर महायुती सरकारच करू शकते आणि ही लोकांचीही मानसिकता झाली आहे. त्यामुळे कोणीही एकत्र येऊ द्या, निवडणुकांचे निकाल लागल्यावर मग बघू, असे म्हणत महाजन यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर भाष्य केले आहे. तसेच मराठी मते काय आमची नाहीत का? विधानसभेत आपण पहिलेच आहे विक्रमी मतांनी आम्ही विजयी झालो होतो. आम्ही भेदभाव करतच नाही. आणि ते निवडणुका आल्या की मराठीचा मुद्दा काढतात, असा टोला ठाकरेंवर लगावला.Girish Mahajan
लोकशाहीत कोणीही कोणाबरोबरही जाऊ शकते
पुढे बोलताना गिरीश महाजन म्हणाले, लोकशाहीत कोणीही कोणाबरोबरही जाऊ शकते. परंतु, लोकांना हे माहीत झाले आहे की आपला विकास कोण करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आपण प्रगती करत आहोत. कोणी कितीही वल्गना केल्या तरी त्याचा उपयोग होणार नाही. तसेच राज ठाकरे यांना जवळ घेण्याचा प्रयत्न केला जात आहे का? असा प्रश्न विचारला असता महाजन म्हणाले यावर मला काही माहीत नाही, देवेंद्र फडणवीस यात लक्ष घालतील.
माझे सगळीकडे लक्ष म्हणत एकनाथ खडसेंना प्रत्युत्तर
एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांना जळगावकडेही लक्ष असू द्या म्हणत डिवचले होते. त्यावर प्रत्युत्तर देताना गिरीश महाजन म्हणाले, काळजी करू नका, माझे सगळीकडे लक्ष आहे. संपूर्ण उत्तर महाराष्ट्राकडे माझे लक्ष आहे. जळगाव असू द्या, धुळे असू द्या, नाशिक असू द्या, नगर असू द्या, तिथल्या जिल्हा परिषद असू द्या, नगरपालिका असू द्या किंवा महानगरपालिका असू द्या. त्यांनाच तुम्ही विचारा निवडून आणताय म्हणून, असे महाजन म्हणाले.
तुमचा खड्डाही गेला आणि अड्डाही गेला
संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत म्हटले होते की 2014 नंतर मोदींनी देश खड्ड्यात घातला. यावर गिरीश महाजन म्हणाले, मग लोकांपुढे जा, त्यांना मत मागायला सांगून की मोदींनी देश खड्ड्यात घातला म्हणून. मग कळेल कोणाला खड्ड्यात कोणी घातले ते. तुम्हाला लोक कुठे ठेवतात हे तुम्हाला कळेल. आता तुमचा पार खड्डाही गेला आणि अड्डाही गेला. तरी यांची बडबड चालूच आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App