विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यात खासगी वाहनांची संख्या वाढल्यामुळे वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले आहे, असा आरोप पोलीस यंत्रणेकडून सतत केला जातो. परंतु पुणेकरांना खड्डे आणि अतिक्रमणमुक्त रस्ते मात्र मिळत नाही. Pune Police
हेल्मेट न घातल्यामुळे दंड वसूल करणारी पोलीस यंत्रणा आणि महापालिका प्रशासन रस्त्यावरील खड्डे दुरुस्तीसाठी कधी तितकीच तत्पर असल्याचं पाहायला मिळत नाही. वाहतूक कोंडीच्या वेळी सिग्नल यंत्रणा कुचकामी ठरत असूनही, मुख्य रस्त्यांवरही वाहतूक पोलीस दिसतं नाहीत. वाहतूक पोलीस नसल्यामुळे कित्येक तास नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. या दररोजच्या वाहतूक कोंडीमुळे शहरातील अनेक वाहनांचा वेग हा ताशी ९ ते १० किमी पर्यंत घसरला आहे. यामुळे नागरिकांचा मौल्यवान वेळ वाया जातो, मात्र प्रशासन याची जबाबदारी घेणार का?
रस्त्यावर सुरक्षेसाठी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे हे सुरेक्षेसाठी कमी आणि दंड वसूल करण्यासाठीच अधिक वापरले जात आहेत. वाहतूक पोलिसांच्या आकडेवारीनुसार पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यात मिळून वाहतूक नियमभंगाच्या ९७ लाख ८७ हजार २८४ प्रकरणात तब्बल ६८८ कोटी १६ लाख ४३ हजार ७५० रुपयांचा दंड बाकी आहे. यामध्ये पुणे शहरात ६५ लाख ४० हजार १७३ प्रकरणातं ४१० कोटी ५६ लाख ६५० रुपये, पिंपरी-चिंचवड मध्ये २३ लाख ६६ हजार ९४९ प्रकरणात २११ कोटी ७३ लाख ४३ हजार ३५० रुपये, तर जिल्ह्यात ८ लाख ८० हजार १६२ प्रकरणात ६५ कोटी ८६ लाख ९८ हजार ७५० रुपये दंड थकीत आहे. Pune Police
नो पार्किंग साठी सतत दंड वसूल करणारी वाहतूक यंत्रणा अतिक्रमणाची कारवाई करतांना दिसत नाही. पुण्यातील अनेक मुख्य रस्त्यांवर उघडपणे अतिक्रमण चालते. याचा अर्थ यंत्रणेचा याला छुपा पाठींबा आहे का? सण उत्सवांच्या वेळी या अतिक्रमणाचा सामान्य नागरिकांना होणारा त्रास वाहतूक पोलिसांना कधी दिसेल?
पोलिसांना वाहनांची संख्या वाढल्याचे मान्य आहे मात्र, रस्त्यावर वाहतूक नियोजनासाठी ते स्वतः हजार नसतात. कोट्यावधी रुपये खर्चून बसवलेली सिग्नल यंत्रणा ही कुचकामी ठरताना दिसतेय. यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीत नागरिकांचा वेळ तर वाया जातोच परंतु यामुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे असंख्य वेगवेगळे आजार देखील होतात. या आजारांच्या उपचाराचा खर्च हा लाखांमध्ये होतो. मग नागरिकांनी हा खर्च यंत्रणेकडून वसूल करावा का? Pune Police
वाहतूक पोलिसांनी मागील दोन वर्षात जवळपास ५७ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. ज्या तत्परतेने यंत्रणा नागरिकांकडून दंड वसूल करते त्याच तत्परतेने यंत्रणेने नागरिकांच्या समस्या देखील विचारात घेतल्या पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने वाहतूक व्यवस्थापन घडेल आणि नागरिकांची या रोजच्या वाहतूक कोंडीतून मुक्ती होईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App