विशेष प्रतिनिधी
मुंबई : धनंजय मुंडे यांचा ‘सातपुडा’ बंगला सोडण्यावरून सध्या राजकीय वातावरण चांगलच तापलेलं आहे. मुंबईत स्वतःच घर असूनही शासकीय बंगला सोडत नसल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. यावर आता मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. Dhananjay Munde
मुंडेंनी याआधीही त्याचं आजारपण व मुलीची शाळा असल्यामुळे बंगला सोडायला वेळ लागत असल्याचं सांगितलं होत. परंतु आता मुंडे यांचा मुंबईत एक फ्लॅट असल्याची माहिती समोर आली आहे. त्यावर, धनंजय मुंडे यांचा मुंबई मधील फ्लॅट हा सध्या राहण्यायोग्य नसल्याचं त्यांनी म्हणलंय. त्याठिकाणी दुरुस्तीचं काम सुरु आहे व फ्लॅट राहण्यायोग्य झाल्यावर लगेच बंगला रिकामा करणार असल्याचंही मुंडेंनी म्हणलंय.
राजकीय वर्तुळात खळबळ
मुंडेंनी ४८ तासांत घर रिकामं करावं नाही तर सरकारला लीगल नोटीस पाठवू असा इशारा अंजली दमानिया यांनी काल दिला होता. इतकंच नाही तर त्यांचा बाकी असलेला दंड देखील सरकारने ४८ तासांच्या आत वसूल करावा असं दमानिया यांनी म्हणलंय. तर करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांचे मुंबईत आणखी ४ फ्लॅट असल्याचा दावा केला आहे. तसचं त्यांना रहायला घर नसेल तर ते माझ्या घरी रहायला येऊ शकतात असंही करुणा शर्मा यांनी म्हणलंय. Dhananjay Munde
धनंजय मुंडेंना याआधीही बसला होता दंड
दरम्यान मंत्रीपदाचा राजीनामा देऊन ५ महिने झाल्यावरही शासकीय निवासस्थान न सोडल्यामुळे मुंडेना ४२ लाखांचा दंड ठोठाविण्यात आलेला आहे. मात्र, संबंधित दंड रद्द करण्याची मुभा मुख्यमंत्र्यांना असते. परंतु मुंडेंना या प्रकारचा दंड ठोठावण्यात येण्याची काही ही पहिलीच वेळ नाही.
धनंजय मुंडे यांच्या २०१६ मधील एका प्रतिज्ञा पत्रात उल्लेख केल्यानुसार, या आधीही मुंडेंना सेवाकर खात्याने दंड ठोठावला होता. मात्र, मुंडेंनी सेवाकर खात्याने लावलेला दंड व व्याज भरला नसल्याच समजत. एकूण ५७ लाख २४ हजार रुपये भरण्याची सूचना सेवाकर खात्याने मुंडेंना दिली होती. मात्र ही दंड आकारणी मान्य नसल्याच सांगून मुंडेंनी या विरोधात उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथे कलम २२६, २२७ अन्वये फौजदारी याचिका दाखल केली होती. मात्र या याचिकेबाबत सध्या कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. Dhananjay Munde
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App