विशेष प्रतिनिधी
मुंबई : Bhaskar Jadhav शिवसेना ठाकरे गटाचे गुहागरमधील आमदार भास्कर जाधव आणि ब्राम्हण सहाय्यक संघात सध्या वाद सुरू आहे. अत्यंत जातीयवादी भूमिका मांडताना जाधव यांनी पेशव्यांवरही निशाणा साधला आहे.Bhaskar Jadhav
शिवसेना ठाकरे गटाच्या मुंबईतील मेळाव्यात बोलताना भास्कर जाधव यांनी गुहागरमधील ब्राम्हण सहाय्यक संघाच्या अध्यक्षांना बेडकाची उपमा देताना अपशब्दांचा वापर केला होता. या टीकेनंतर आक्रमक झालेल्या गुहागरमधील ब्राम्हण समाजाने भास्कर जाधव यांनी माफी मागावी, अशी मागणी केली होती. मात्र भास्कर जाधव आपल्या वक्तव्यावर ठाम होते. यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवत ब्राम्हण समाजाल डिवचलं आहे.Bhaskar Jadhav
छत्रपती शिवाजी महाराजांचं समुद्रातलं आरमार पेशव्यांनी बुडवल्याचा साने गुरुजींचा एक व्हिडीओ भास्कर जाधव यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर ठेवला आहे. या व्हिडीओमध्ये दिसते की, शाळकरी वयातील साने गुरुजी अत्यंत प्रभावीपणे वर्गातील शिक्षकांसमोर मुद्दे मांडताना दिसत आहेत. ते म्हणतात की, छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या दूरदृष्टीने उभारलेले आणि कान्होजी आंग्रे यांनी जिवापाड सांभाळलेले मराठा आरमार पेशव्यांनी इंग्रजांशी संगनमत करून समुद्रात बुडवले. पेशव्यांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी परकीय शक्ती असलेल्या इंग्रजांशी हातमिळवणी करून स्वराज्याच्या नौदलाचा घात केला. ही इतिहासातील एक मोठी चूक होती, ज्यामुळे भारताच्या सागरी सार्वभौमत्वाला मोठा धक्का बसला, असे मत साने गुरुजी व्हिडीओमध्ये मांडताना दिसत आहेत. भास्कर जाधव यांच्या या व्हॉट्सअॅप स्टेट्समुळे ब्राम्हण समाजाच्या विरोधातील नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे
मुंबईतील शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्यात बोलताना भास्कर जाधव यांनी ब्राह्मण सहाय्यक संघाचे गुहागर तालुका अध्यक्ष घनशाम जोशी यांना बेडकाची उपमा दिली होती. तसेच ब्राह्मण म्हणजे पाताळयंत्री असतात. आज मी जे बोलतोय, त्याचे परिणाम काय होतील याची मला चिंता नाही. कारण निवडणुकीत मला पराभूत करण्यासाठी बौद्ध समाजाला माझ्याविरोधात भडकवण्यात आले होते. वंचित आघाडीचे अण्णा जाधव यांच्यावर हल्ला झाला, त्यावेळी माझं नाव घेण्यात आलं होतं. तसेच घनशाम जोशी यांनी पक्ष म्हणून पत्र लिहिलं असतं, तर मला काही वाटल नसतं, पण समाज म्हणून त्यांनी पत्र लिहिलं, याचं मला वाईट वाटलं. परंतु माझ्याविरोधात जिल्ह्यात पत्र द्या, नाहीतर राज्यात द्या, मी ते गटारात फेकून देतो, अशा शब्दांत भास्कर जाधव यांनी नाराजी व्यक्त केली होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App