नाशिक : दुधाची तहान ताकावर भागवण्याचा लागला छंद; मोदी + शाहांचा पराभव केल्याचा विरोधकांना “आनंद”!!, असे म्हणायची वेळ विरोधी पक्षांच्या राजकीय वर्तणुकीतून पुढे आली.
– त्याचे झाले असे
दिल्लीतल्या कॉन्स्टिट्यूशन क्लबच्या निवडणुकीत राजीव प्रताप रूडी आणि संजीव बलियान या दोन भाजपच्याच खासदारांचा आमना – सामना झाला. त्या निवडणुकीतले मतदान झाले. एरवी त्या मतदानात 1200 पैकी 100 – 150 सदस्य भाग घेत असताना यावेळी चुरशीच्या निवडणुकीत 700 पेक्षा जास्त मतदारांनी भाग घेतला. त्यामध्ये सोनिया गांधी, अमित शाह, मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी वगैरे बड्या नेत्यांचाही समावेश राहिला. त्यामुळे माध्यमांना कॉन्स्टिट्यूशन क्लबच्या निवडणुकीचे मोठे राजकीय खाद्य मिळाले. कॉन्स्टिट्यूशन क्लबची निवडणूक ही भाजप विरुद्ध भाजप झाली आणि त्यामध्ये काँग्रेसच्या खासदारांनी मतदान करून अमित शाहांच्या उमेदवाराला पाडले, असा प्रचार आणि प्रसार विरोधकांनी आणि प्रसार माध्यमांनी केला.
जणू काही कॉन्स्टिट्यूशन क्लबची निवडणूक ही देशाच्या लोकसभेची किंवा कुठल्या मोठ्या राज्याच्या विधानसभेची असल्याचा आव विरोधकांनी आणि माध्यमांनी आणला.
प्रत्यक्षात भाजप विरुद्ध भाजप अशा झालेल्या निवडणुकीत भाजपच्या राजीव प्रताप रुडी यांची कॉन्स्टिट्यूशन क्लबच्या प्रशासकीय सचिव पदी निवड झाली. त्यापलीकडे या निवडणुकीत फारसे काही घडले नाही
पण अमित शाह यांनी संजीव बलियान यांना उभे केले होते. उत्तर प्रदेश मधल्या लॉबीचा त्यांना पाठिंबा होता, वगैरे बातम्या माध्यमांनी विरोधकांच्या हवाल्याने पेरल्या होत्या. ज्या प्रत्यक्षात खऱ्या असण्याची शक्यताच नव्हती, पण या निवडणुकीत राजीव प्रताप रूडी जिंकले आणि संजीव बलियान पडले म्हणजेच अमित शाह पराभूत झाले, असा राजकीय निष्कर्ष विरोधकांनी आणि माध्यमांनी काढला. त्याचेच ढोल पिटले. प्रत्यक्षात कुठल्याच निवडणुकीत अमित शाह यांचा पराभव करता येत नाही म्हणून “त्यांच्या उमेदवाराचा” “पराभव” करून विरोधकांनी दुधाची तहान ताकावर भागवली.
– वाराणसीत खाल्ले मोदीविरोधकांनी पेढे
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघात घडले. मोदींच्या विरोधात उभे राहिलेल्या काँग्रेस उमेदवार अजय राय यांच्या घरी आज समाजवादी पक्षाचे नेते पोहोचले. ते हार, पुष्पगुच्छ, पेढे बर्फी वगैरे मिठाई घेऊन तिथे गेले होते. मोदींच्या विरोधात अजय राय हेच खरं म्हणजे “निवडून” आले, तेच वाराणसीचे “खासदार” झाले म्हणून त्यांच्या विजय उत्सव करण्यासाठी आम्ही आलो आहोत, असा आव समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी आणला होता.
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत अजय राय यांनी प्राथमिक फेरीमध्ये मोदींना मागे टाकले होते. परंतु, नंतर मोदी मतांची चोरी करून निवडून आले, अशी खिल्ली समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी उडवली आणि अजय राय यांच्या विजयाबद्दल स्वतः आणलेली मिठाई स्वतःच खाल्ली. हा देखील प्रकार दुधाची तहान ताकावर भागवण्या सारखाच ठरला. प्रत्यक्षात वाराणसीतून मोदींना सलग तिसऱ्या निवडणुकीत काँग्रेसला हरविता आले नाही, मग त्यांच्या विरोधातल्या उमेदवाराने सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये मोदींना मागे टाकले होते, याचा विजय साजरा करायला काय हरकत आहे??, असे म्हणत विरोधकांनी स्वतः आणलेली मिठाई स्वतःच खाल्ली. दुधाची तहान ताकावर भागवून घेतली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App