विशेष प्रतिनिधी
बीड : Lakshman Hake मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईत जाळपोळ व दंगल घडवण्याचा कट आहे. त्यामुळेच ते ऐण सनावारांच्या दिवसांत मुंबईला जात आहेत, असा दावा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मंगळवारी केला. या प्रकरणी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जरांगेंना आंतरवाली सराटीतच रोखण्याचे आवाहनही केले आहे.Lakshman Hake
मनोज जरांगे येत्या 29 ऑगस्टपासून मुंबईत मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणार आहेत. ते आपल्या समर्थकांसह आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. सध्या ते पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाऊन याविषयी वातावरण निर्मिती करत आहेत. त्यांच्या या आंदोलनाची तारीख जसजशी जवळ येत आहेत, तसतसे राज्याचे राजकारण तापत आहे. या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.Lakshman Hake
लक्ष्मण हाके मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, मनोज जरांगे यांनी बीड शहर जाळले. त्यांना त्याच गोष्टी मुंबईत जाऊन करायच्या आहेत. यासाठीच त्यांनी गणेशोत्वसाची तारीख निवडली. मुंबईला जायचे आणि दंगल घडवून आणायची हाच एकमेव कार्यक्रम त्यांचा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझी विनंती आहे की, त्यांनी जरांगे यांचा सणासुदीच्या वातावरणात जाळपोळ करण्याचा डाव रोखावा. त्यांना आंतरवाली सराटीतच उपोषण करण्याची परवानगी द्यावी.Lakshman Hake
मनोज जरांगे यांची बाषा प्रक्षोभक व चिथावणीखोर आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगात डांबावे. त्यांची मागणी अवैध आहे. त्यानंतरही सरकार त्यांचे लाड का करत आहे? जरांगे यांनी थोडासा अभ्यास करून हिंदी विषयाचे अवलोकन करावे, असे ते म्हणाले.
शरद पवारांकडून ओबीसींना वेड्यात काढण्याचा प्रयत्न
लक्ष्मण हाके यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला. शरद पवार व मनोज जरांगे यांचा एकमेवर कार्यक्रम हा राज्यातील वातावरण बिघडवण्याचा आहे. जरांगेंच्या झुंडशाहीला बळी पडून प्रशासनाने एखादा वेगळा निर्णय घेतला तर ओबीसी समाज त्याला जोरदार प्रत्युत्तर देईल. शरद पवार हे मंडल आयोगाचे जनक आहेत ही शुद्ध भामटेगिरी आहे. ओबीसींना वेड्यात व मूर्खात काढण्याचा प्रयत्न शरद पवार करत आहेत, असे ते म्हणाले.
उल्लेखनीय बाब म्हणजे मनोज जरांगे यांनी नुकताच देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधताना ते एकनाथ शिंदेंसह सरकारमधील सर्वच नेत्यांना संपवत असल्याचा आरोप केला होता. एवढेच नाही तर भविष्यात मराठा विरुद्ध ओबीसी अशी एखादी दंगल झाली तर त्याला फडणवीसच जबाबदार असतील असा आरोपही त्यांनी केला होता.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App