महादेवपुराचे उदाहरण देणाऱ्या राहुल गांधींना बारामतीचे उदाहरण देऊन अजितदादांचे प्रत्युत्तर!!

वृत्तसंस्था

मुंबई : लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कर्नाटक मधल्या महादेवपुरा मतदारसंघाचे उदाहरण देऊन लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या मतदानात एवढा फरक कसा??, असा सवाल करून मतांची चोरी झाल्याचा आरोप केला होता. त्या आरोपाला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज बारामतीचे उदाहरण देऊन प्रत्युत्तर दिले.

अजित पवार म्हणाले :

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका वेगवेगळ्या झाल्या. लोकांनी आपल्याला हवे तसे मतदान केले. बारामती मतदार संघाचे उदाहरण घेतले, तर लोकसभा निवडणुकीत आमच्या उमेदवाराला (सुनेत्रा पवार) 48000 मते कमी मिळाली होती. ते सत्य आम्ही स्वीकारले. त्यानंतर पाचच महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत बारामतीच्या मतदारांनी मला 100000 मते जास्त देऊन निवडून आणले. तोही निकाल आम्ही स्वीकारला. पण काही लोकांना कधी यशच मिळत नाही म्हणून ते वेगवेगळे मुद्दे उकरून काढतात.

मतदान प्रक्रिया आणि मतदार यादीतील काही समस्या या विषयावर तोडगा काढायचा अधिकार सरकारचा आणि लोकांचाही नाही, तर तो निवडणूक आयोगाचा आहे. निवडणूक आयोग मतदार यादीतल्या घोळांचे उत्तर देईल. घोळ असतील तर निस्तरतील, यादीत घोळ नसतील, तर तसे सांगतील. तो निवडणूक आयोगाचा अधिकार आहे.

Rahul Gandhi’s allegations regarding Maharashtra elections, Deputy CM Ajit Pawar

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात