मतांच्या चोरी विरोधात राहुल गांधींची वातावरण निर्मिती, काँग्रेस अध्यक्षांनी घातली 5 स्टार जेवणावेळी; पण पक्षातला असंतोष रोखण्यात दोन्ही ठरले अपयशी!!, हीच समोर आली काँग्रेस मधली कहाणी!!
गेल्या काही दिवसांमध्ये राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर मतांच्या चोरीचा आरोप करून मोठे वातावरण निर्मिती केली. मतं चोरीच्या बहाण्याने सगळ्या विरोधी पक्षांवर आपले नेतृत्व लादून घेतले. आपल्या नेतृत्वाखाली 300 खासदारांचा मोर्चा काढायला लावला. दिल्लीत या निमित्ताने मोठे राजकीय नाट्य घडविले. पण मोर्चा पोलिसांनी अडवल्यामुळे सगळे विरोधी खासदार दिल्लीच्या रस्त्यावर बसले.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोर्चा काढून दमलेल्या खासदारांचा श्रमपरिहार केला. त्यांनी चाणक्यपुरी मधल्या ताज पॅलेस हॉटेलमध्ये विरोधी पक्षांच्या सगळ्या 300 खासदारांना 5 स्टार जेवणावळी दिली.
एवढे सगळे करूनही काँग्रेसला पक्षामधला असंतोष रोखण्यात मात्र अपयश आल्याचेच उघड दिसले. मतांच्या चोरीच्या विरोधातली फार मोठी वातावरण निर्मिती काँग्रेस मधली पडझड रोखण्यात अपयशी ठरली.
– आनंद शर्मांचा राजीनामा
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी पक्षातल्या परराष्ट्र विभागाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. काँग्रेसचे परराष्ट्र धोरण त्यांना पटले नसल्याचा तो परिपाक ठरला. ऑपरेशन सिंदूर दरम्यान काँग्रेसने मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर टीका केली होती, पण आनंद शर्मा हे परदेशांमध्ये गेलेले शिष्टमंडळामध्ये सहभागी झाले होते. काँग्रेस आणि शर्मा यांच्यातले परराष्ट्र धोरणात विषयीचे मतभेद उघड झाले होते. या पार्श्वभूमीवर आनंद शर्मांनी काँग्रेसच्या परराष्ट्र विभागाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देणे उचित समजले. त्यानुसार त्यांनी राजीनामा दिला. पण राहुल गांधी आनंद शर्मांना पद सोडण्यापासून रोखू शकले नाहीत.
– फैजल पटेलांचा आवाज उठला
आनंद शर्मा यांच्या राजीनाम्याबरोबरच गुजरात मधून काँग्रेसच्या नेतृत्वावर एक मोठा आवाज उठला. सोनिया गांधींचे माजी राजकीय सचिव अहमद पटेल यांचे चिरंजीव फैजल पटेल यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर टीका केली. काँग्रेसचे सध्याचे नेतृत्व चुकीच्या मार्गदर्शकांनी घेरले आहे. त्यामुळे पक्षाची धोरणे चुकत आहेत. मोदी सरकारने ऑपरेशन सिंदूर दरम्यान चांगले काम केले त्याची दखल काँग्रेस घेत नाही याचे कारण काँग्रेस मधले नेतृत्व भोवतीचे सल्लागार त्यांना चुकीचा सल्ला देतात, असे टीकास्त्र फैजल पटेल यांनी सोडले. के. सी. वेणुगोपाल यांच्यावर त्यांचा रोख होता. फैजल पटेल यांनी मोदींच्या नेतृत्वाची स्तुती केली. राहुल गांधी फैजल पटेल यांना पक्षांमध्ये योग्य जागेवर सामावून घेऊ शकले नाहीत, याचा हा परिपाक ठरला.
– कर्नाटकच्या मंत्र्याचा राजीनामा
ज्या कर्नाटकच्या मतं चोरी वरून राहुल गांधींनी मोठे राजकीय रान उठवले, सगळ्या विरोधी पक्षांवर आपले नेतृत्व लादले, त्याच कर्नाटकात काँग्रेस मधूनच राहुल गांधींच्या मत चोरीच्या मुद्द्याच्या विरोधात आवाज उठला. सिद्धरामय्या सरकार मधले त्यांचे समर्थक मंत्री राजण्णा यांनी मतं चोरीसाठी काँग्रेसलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. मतांची चोरी झाली असेल, तर त्याला काँग्रेसच जबाबदार आहे, असे टीकास्त्र त्यांनी सोडले. त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, पण आपला मुद्दा सोडला नाही. राहुल गांधी सुद्धा त्यांना आपला मुद्दा पटवून देऊ शकले नाहीत. याचा परिपाक रामण्णा यांच्या राजीनाम्यात झाला.
उल्लेख केलेल्या तिन्ही घटनांवरून हेच सिद्ध झाले की मतांच्या चोरी विरोधात राहुल गांधींनी मोठी वातावरण निर्मिती केली, काँग्रेसच्या अध्यक्षांनी 5 स्टार जेवणावेळी दिली, पण ही सगळी राजकीय मशागत काँग्रेस मधली संघटनात्मक एकजूट टिकवण्यात अपयशी ठरली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App