विशेष प्रतिनिधी
मुंबई : Bawankule मुंबईत राजकीय तापमान चढवणारा शाब्दिक वाद सुरू झाला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी महायुती सरकारवर आणि विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर “चीफ नव्हे तर थीफ मिनिस्टर” असा आरोप करत जोरदार हल्ला चढवला होता. त्यांच्या या वक्तव्यावर ज्येष्ठ भाजप नेते तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट पलटवार करत उद्धव ठाकरेंवर खंडणीखोरीचे गंभीर आरोप लावले.Bawankule
बावनकुळे म्हणाले की, “उद्धवजी, खंडणीखोरांचा सरदार कोण आहे, हे महाराष्ट्रातील प्रत्येकाला माहिती आहे. उद्योगपतींच्या घराबाहेर जिलेटीन ठेवून, तुमच्या नेतृत्वात शंभर कोटींची वसुली सुरू होती, हे जनता विसरलेली नाही. त्यामुळे फडणवीसांवर टीका करण्यापूर्वी आपला भूतकाळ आठवा.” त्यांनी पुढे टोला लगावत सांगितले की, विधानसभा निवडणुकीत कोण ‘चीफ मिनिस्टर’ आणि कोण ‘थीफ मिनिस्टर’ हे जनतेनेच दाखवून दिले आहे.Bawankule
त्यांनी उद्धव ठाकरेंवर इतर राजकीय मुद्द्यांवरूनही टीका केली. “इंडी आघाडीत तुमची किंमत शेवटच्या रांगेत आहे, म्हणून तुम्ही दिल्लीतील आंदोलनात गेले नाहीत. इथे चार टाळके घेऊन आंदोलन करून लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, पण तो निष्फळ ठरला,” असे ते म्हणाले. तसेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना लोकशाही आणि नैतिकतेचा गळा घोटला, असा आरोपही त्यांनी केला.
बावनकुळे यांनी फडणवीसांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना म्हटले की, “फडणवीसांचे काम भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र घडवण्याबरोबरच स्थिर, विकासाभिमुख आणि पारदर्शक प्रशासन देण्याचे आहे. महाराष्ट्रातील जनतेचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. उलट तुम्हाला लोकं कंटाळले आहेत.”
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App