विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असतांनाच, आणखी एका विवाहितेने आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं आहे. रक्षाबंधनाला भावाने २० लाख रुपये नाही दिले तर त्याला मारून टाकू, अशी धमकी नवऱ्याने विवाहितेला दिली होती. त्यानंतर तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. Dowry Victim
स्नेहा विशाल झेंडगे (वय २७) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. पुण्यातील कात्रज भागातील आंबेगाव बुद्रुक येथे ती वास्तव्यास होती. तरुणीचा शारीरिक आणि मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून भारती विद्यापीठ पोलिसांकडून पतीसह सासरकडील नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत स्नेहा यांचे वडील कैलास मच्छिंद्र सावंत (वय ५५, रा. कर्देहळी, जि. सोलापूर) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पती विशाल झेंडगे, सासरे संजय झेंडगे, सासू विठाबाई झेंडगे, दीर विनायक झेंडगे, नणंद तेजश्री थिटे यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
स्नेहाला किती टोकाचा मानसिक आणि शारीरिक त्रास सासरच्या मंडळींकडून होत होता, याचे नवनवीन खुलासे आता होत आहेत. झेंडगे कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसारच आम्ही स्नेहाचं मोठ्या थाटात लग्न लावून दिलं होत, आम्हाला त्याचा फार खर्चही आला होता. पण यातून सुद्धा झेंडगे कुटुंबाच समाधान झालं नाही. तिला वारंवार पैशांची मागणी होत होती. असे गंभीर आरोप स्नेहाच्या वडिलांनी तिच्या सासरच्या मंडळींवर केले आहेत. झेंडगे कुटुंब सुरुवातीला मोहोळ या ठिकाणी राहत होते. तिथं शेत जमीन घ्यायला सुरवातीला आम्ही त्यांना पाच लाख रुपये दिल्याचं सुद्धा स्नेहाच्या वडिलांनी सांगितलं. Dowry Victim
त्यानंतर हे कुटुंब पुण्यामध्ये शिफ्ट झालं. परंतु आपली मुलगी पुण्यामध्ये कुठे राहते याचा पत्ता सुद्धा स्नेहाच्या माहेरच्या कुटुंबाला नव्हता. झेंडगे कुटुंबाची एक कंपनी वेळू येथे आहे. त्यामुळे स्नेहाचा भाऊ तिची चौकशी करण्यासाठी कंपनीत गेला असता, त्याला देखील तिथून अपमान करून हाकलून देण्यात आले.
स्नेहा आणि विशाल या दोघांचे लग्न मागील वर्षी झाले होते. स्नेहलला स्वयंपाक येत नसल्याने तिला त्रास द्यायला सुरवात झाली. स्नेहलने याबाबत आधी देखील पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. परंतु सासरच्या मंडळींनी तिच्यावर दबाव आणून तिला ही तक्रार मागे घ्यायला लावली. पैशांसाठी तिच्यामागे सतत तगादा लावण्यात आला. माहेरून पैसे आणण्यासाठी तिचा केवळ मानसिक छळच नाही, तर शिवीगाळ आणि मारहाण देखील केली जात होती. शेवटी या छळाला कंटाळून स्नेहाने शनिवारी (ता.९) रात्री ११ च्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App