नाशिक : लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या घरी झालेल्या मतचोरीच्या प्रेझेंटेशनच्या वेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षप्रमुख शरद पवार यांना शेवटच्या रांगेत बसवल्याची बातमी महाराष्ट्रभर गाजली. “मराठी अस्मिता” त्यामुळे “बिघडली”. या बातमीमुळे भाजप आणि त्याच्या मित्र पक्षांना ठाकरे + पवारांच्या पक्षांना ठोकायची संधी मिळाली. ठाकरे आणि पवारांच्या पक्षांनी भाजप आणि त्याच्या मित्र पक्षांनाही उलटे ठोकून घेतले. पण आता मागच्या रांगेतले आणि पुढच्या रांगेतले हा वाद आज पोलिसांच्या बस मध्ये “मिटला”. “मागच्या” रांगेतून संजय राऊत “पुढे” आले आणि पोलिसांच्या बस मध्ये राहुल गांधींच्या शेजारी बसले, असे आज घडले.
मतचोरीच्या विरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल करण्यासाठी राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सगळ्या विरोधकांनी मोठा मोर्चा काढला. त्यामध्ये विरोधी पक्षांचे सुमारे 300 खासदार सहभागी झाले. निवडणूक आयोगाने चर्चेसाठी 30 खासदारांच्या शिष्टमंडळाला निवडणूक आयोगात येण्याची परवानगी दिली होती. परंतु, विरोधकांना सगळेच्या सगळे म्हणजे 300 खासदार निवडणूक आयोगात घुसवायचे होते. पोलिसांनी विरोधकांचा हा डाव वेळीच ओळखला आणि संसद परिसरातून बाहेर पडतानाच मोर्चातल्या खासदारांना ताब्यात घेतले.
यादरम्यान अखिलेश यादव यांनी पोलिसांच्या बॅरिकेट वरून उडी मारली. अन्य दोन-तीन महिला खासदारांनी देखील बॅरिकेट वरून उड्या मारल्या. त्यामुळे संसद भवन परिसरात राजकीय नाट्य निर्माण झाले त्याच्या बातम्या माध्यमांनी चालविल्या.
पोलिसांनी या सगळ्या खासदारांना ताब्यात घेऊन बसमध्ये बसविले. राहुल गांधी आणि अन्य खासदारांनी बसच्या खिडक्यांमधून बाहेर डोकावून माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या. त्यांनी निवडणूक आयोगाने मोदी सरकारचा जोरदार निषेध केला. पण याच दरम्यान बस मध्ये देखील मोठे राजकीय नाट्य रंगले. बस मध्ये मागच्या रांगेत बसलेले संजय राऊत पुढे आले आणि राहुल गांधींच्या शेजारी बसले. त्यामुळे राहुल गांधींच्या घरी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना मागे बसविण्याचा वाद संजय राऊत यांनी राहुल गांधी यांच्या शेजारी बसून “मिटवून” टाकला. संजय राऊत यांनी अशाप्रकारे “महाराष्ट्राची अस्मिता” ढळण्यापासून “वाचवली”.
तसेही संजय राऊत कार्यकारी संपादक असल्याने “सच्चाई” नावाचे सदर लिहितातच. आज त्यांनी राहुल गांधींच्या शेजारी बसण्याच्या प्रत्यक्ष कृतीतून आणखी एक “सच्चाई” पुढे आणली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App