विशेष प्रतिनिधी
मुंबई : राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर लावलेल्या मत चोरीच्या आरोपानंतर देशातील राजकारणात एकच खळबळ उडाली. राहुल गांधींपाठोपाठ आता बरेच बडे नेतेही या विषयावर अनेक धक्कादायक खुलासे करत आहेत. याच विषयावर शरद पवार यांनी देखील एक धक्कादायक विधान केलं होतं. राज्यातील २०२४ विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीत असतांना दोन लोकं आपल्याला भेटायला आलेली. त्यांनी आपल्याला १६० जागा जिंकवून देण्याची खात्री दिली होती, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. Devendra Fadnavis
शरद पवार यांच्या या आरोपाबद्दलही राजकीय वर्तुळात बरीच चर्चा चालू आहे. काही नेते हे पवार यांच्या आरोपाची पुष्टी करत त्यांना पाठींबा देणारं वक्तव्य देत आहेत. तर काही नेते पवार जाणून बुजून खोटं बोलत असल्याचा दावा करत आहेत.
आदित्य ठाकरे यांनी पवारांच्या या विधानावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. पवार साहेब हे खूप अनुभवी नेते आहेत. त्यांनी अनेक निवडणुका जवळून बघितल्या आहेत, त्यामुळे अशा विषयावर ते खोटं बोलणार नाहीत. जे काही घडलं असेल त्यानुसारच त्यांनी वक्तव्य केलं, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी पवारांना पाठींबा दिलं. इतकंच नाही तर, देशात जर अशा प्रकारच्या ऑफर्स येत असतील. तर याचा अर्थ निवडणूक आयोगात काही तरी गडबड आहे. राहुल गांधी खोटं बोलत आहेत असं जर निवडणूक आयोगाला वाटत असेल. तर त्यांनी एका मंचावर यावं आणि इंडिया आघाडीने उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं द्यावी. हे सगळं आता देशाची जनता सहन करणार नाही, असंही आदित्य ठाकरे म्हणाले. Devendra Fadnavis
फडणविसांनी चांगलेच सुनावले
एकीकडे आदित्य ठाकरेंसारखे नेते पवारांच्या वक्तव्याला पाठींबा देत असतांना, दुसरीकडे फडणविसांनी मात्र पवारांना त्यांच्या या वक्तव्यावरून चांगलेच सुनावले आहे. शरद पवारांचा दावा म्हणजे सलीम-जावेदच्या गोष्टी आहेत, असा टोला त्यांनी लगावला आहे. ही सगळी सलीम-जावेदची कथा चालली आहे, असं ते म्हटले. तुम्ही जर जबाबदार नागरिक आहात आणि अशाप्रकारे तुमच्याकडे कोणी आलं तर तुम्ही पोलिस तक्रार का नाही केली? निवडणूक आयोगाला तक्रार का नाही केली? तुम्ही याचा वापर करून बघणार होतात का? त्यामुळे मला वाटतं या सगळ्या सलीम-जावेदच्या गोष्टी आता बंद केल्या पाहिजेत, असं ते म्हटले. Devendra Fadnavis
निवडणूक आयोगासमोर का बोलत नाही?
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, हा सगळा प्रकार आता गंभीर होत चालला आहे. हे सगळे मिळून अशा प्रकारची कॉन्स्परसी तयार करत आहे. कोणी फसवणुकीचा प्रयत्न करत असेल, तर तुम्ही ते पोलिसांना कळवायला हव होतं. ह्या सगळ्या गोष्टी थोतांड आहेत. कारण याआधीच निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्ष आणि हॅकर्सना चार वेळा ईव्हिएम हॅक करण्याचं ओपन चॅलेंज दिले आहे. मात्र अजूनपर्यंत कोणीही ईव्हीएम हॅक करू शकलेले नाही. निवडणुकीविषयी इथे तिथे बोलण्यापेक्षा निवडणूक आयोगासमोरच का बोलत नाही? निवडणूक आयोग त्यांना पत्र देत आहे, नोटीस देत आहे, जाहीर निमंत्रण देत आहे. तिथे मात्र हे बोलत नाही. मी यापूर्वीही सांगितलं आहे शूट अॅण्ड स्कूट, गोळा डागा आणि पळून जा ही यांची रणनीती आहे, असा आरोप फडणविसांनी केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App