विशेष प्रतिनिधी
मुंबई : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीचे प्रकरण उघडकीस आणल्यामुळे निवडणूक आयोग सध्या आरोपीच्या पिंजऱ्यात आहे. राहुल गांधी यांनी प्रेंझेंटेशनच्या माध्यमातून कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीत कशी मतचोरी झाली हे पुराव्याने आणि आकडेवारीने दाखवून दिले आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी (11 ऑगस्ट) इंडिया आघाडी निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करणार आहे. India Alliance
महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून राज्यात महाराष्ट्र जनआक्रोश आंदोलन छेडण्यात येणार आहे. महायुती सरकारमधील भ्रष्टाचाराचे आरोप असलेले आणि वादग्रस्त मंत्री तसेच आमदारांची हकालपट्टी करावी, या मागणीसाठी हे आंदोलन केले जाणार आहे. हे आंदोलन प्रत्येक जिल्ह्यात करून कलंकित मंत्री आणि आमदारांवर कारवाई करण्यासाठी सरकारवर दबाव आणला जाणार आहे. त्यामुळे 11 ऑगस्ट रोजी दिल्लीसह महाराष्ट्र धडक मोर्चांमुळे दुमदुमून जाणार आहे. India Alliance
नवी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या नेत्यांची 7 ऑगस्ट रोजी बैठक झाली. यावेळी कर्नाटकसह महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मतांचा घोटाळा झाल्याची चर्चा करण्यात आली. या निमित्ताने काँग्रेसने मतचोरी आरोपावर सखोल अभ्यास करून मतचोरीचा घोटाळा कसा झाला, याची आकडेवारी सादर केली. याचे प्रेंझेंटेशन आणि पत्रकार परिषद राहुल गांधी यांनी घेतली. त्यामुळे निवडणूक आयोग बॅकफूटवर आल्याची चर्चा आहे. India Alliance
त्यानंतर आयोगावर झालेल्या आरोपांना भाजपकडून उत्तरे देण्यात आली. त्यामुळे आरोप आयोगावर मग उत्तरे भाजपकडून का, असा सवाल इंडिया आघाडीकडून करण्यात आला. राहुल गांधी यांच्या आरोपांनंतर निवडणूक आयोगाने त्यांच्या आरोपांसाठी प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे. मात्र, लोकसभेत शपथ घेतली आहे त्यामुळे प्रतिज्ञापत्र सादर करण्याची आवश्यकता नाही, असे उत्तर राहुल गांधी यांनी दिले आहे.
दिल्लीत इंडिया आघाडी निवडणूक आयोग कार्यालयावर धडकणार आहे तर महाराष्ट्रात ठाकरे गट सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेणार आहे. सरकारमधील भ्रष्टाचाराचे आरोप तसेच वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना घरी बसवा या मागणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्र जनआक्रोश आंदोलन केले जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App