Thackeray brothers : कॉंग्रेस आणि पवारांना ठाकरेंची सेना बाय-बाय करणार?

Thackeray brothers

विशेष प्रतिनिधी 

मुंबई : महाराष्ट्रात मराठी भाषेच्या मुद्द्यावरून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे एकत्र आले होते. त्यानंतर आगामी महापालिका निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. असे असतांनाच शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज (ता.९), मुंबई येथील एका पत्रकार परिषदेत बोलतांना या शक्यतांना दुजोरा दिला. Thackeray brothers



राऊत काय म्हटले?

मुंबई महापालिका निवडणुकीत उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची शक्यता आहे. हा निर्णय पूर्णपणे दोन्ही बंधूंच्या हातात असल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलंय. ही युती केवळ राजकारणाशी संबंधित असून, राष्ट्रीय स्तरावर किंवा इंडिया आघाडीत यात चर्चा होत नसल्याचही राऊत यांनी सांगितलं. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा केंद्रबिंदू मराठी भाषा, मराठी अस्मिता, मराठी स्वाभिमान आणि महाराष्ट्राचे रक्षण हाच आहे, असं संजय राऊत यांनी नमूद केलं.

उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती हा इंडिया आघाडीचा भाग नाही, हा स्थानिक स्वराज्य संस्थांचा विषय आहे. महाविकास आघाडी ही विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी निर्माण झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अजून कोणतीही आघाडी तयार झाली नसल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. मुंबई हा विषय वेगळा असल्यामुळे त्याबाबत स्वतंत्र भूमिका घ्यायला उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे हे समर्थ आहेत, असे संजय राऊत म्हणाले. Thackeray brothers

ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे महाविकास आघाडीत नाराजीचा सूर?

महाविकास आघाडी ही केवळ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपुरती मर्यादित आहे तिचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांशी काहीही संबंध नाही, असं विधान संजय राऊत यांनी केलं. यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याचं बोललं जातंय. यावर, इंडिया आघाडीच्या बैठकीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष चर्चा होते. दोन प्रमुख लोक एकत्र येत असल्यामुळे इंडिया आघाडीमध्ये कोणालाही आक्षेप नाही. दोन बंधू जर एकत्र येत असतील तर त्यावर कोणी का आक्षेप घेईल? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

ठाकरे बंधूंच्या युतीवर शरद पवारांचं काय मत?

ठाकरे बंधूंच्या युतीबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी यावर त्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. महानगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांविषयी अजून आमच्यात काहीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे एखाद्या पक्षाने त्यावर काही मतं मांडली असतील तर त्या संबंधी मी भाष्य करू शकत नाही. आम्ही एकत्र बसून एकमताने काय तो निर्णय घेण्याचा प्रयत्न करू, असं शरद पवार यांनी नागपूर मधील एका पत्रकार परिषदेत सांगितलं. Thackeray brothers

राऊत यांच्या वक्तव्यावरून ठाकरे बंधू आगामी महापालिका निवडणुक स्वबळावरच लढणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. अशात महाविकास आघाडीची काय भूमिका काय असेल हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

Will the Thackeray brothers abandon Congress and Pawar?

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात