राहुल गांधींना कर्नाटकातली दिसली मतदार यादीची “चोरी”; पण मालेगावातली नाही दिसली शिरजोरी; शिवाय कर्नाटकातले जात सर्वेक्षणही जुन्याच मतदार यादीनुसार!!

karnatakA

नाशिक : राहुल गांधींना कर्नाटकातल्या महादेवपुरा मतदारसंघातली दिसली मतदार यादीची “चोरी”; पण मालेगावातली नाही दिसली शिरजोरी!!, असेच राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेनंतर‌ उघड झाले. पण त्या पलीकडची गोष्ट म्हणजे कर्नाटकात निवडणूक आयोगाच्या सध्याच्या ज्या मतदार यादीवर राहुल गांधींनी आक्षेप घेतला, त्याच मतदार यादीवर आधारित राज्यातले जात सर्वेक्षण करायचा निर्णय तिथल्या काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारने घेतला. कर्नाटकचे मंत्री एच. आर. पाटील यांनी ही माहिती 7 ऑगस्ट रोजी पत्रकारांना दिली.

कर्नाटकातल्या मतदार यादीवर आक्षेप घेताना राहुल गांधींनी मतांच्या चोरीचा आरोप केला‌‌. त्यासाठी त्यांनी बेंगलोर सेंट्रल लोकसभा मतदारसंघातल्या महादेवपुरा विधानसभा मतदारसंघांचे उदाहरण दिले. बेंगलोर सेंट्रल लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला 626208 मते मिळाली, तर भाजपला 658915 मते मिळाली. मतांमध्ये 32707 फरक पडला. पण महादेवपुरा या एकाच विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप यांच्यात फार मोठा फरक पडला. भाजपला इथे 229632 मते मिळाली, तर काँग्रेसला फक्त 115586 मते मिळाली. दोन्ही पक्षांच्या मतांमध्ये 114046 मतांचा फरक पडला. इथेच 100250 मतांची चोरी झाल्याचे काँग्रेसच्या पडताळणीत आढळले, असा दावा राहुल गांधींनी केला.

मालेगावात मतांची शिरजोरी

राहुल गांधींना महादेवपुरा विधानसभा मतदारसंघातली मतांची “चोरी” दिसली, पण महाराष्ट्रातल्या मालेगावातली मतांची शिरजोरी दिसली नाही.

धुळे लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या मालेगाव विधानसभा मतदारसंघात भाजपला फक्त 4542 मते मिळाली, तर काँग्रेसला तब्बल 198869 मते मिळाली.



धुळे लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या अन्य सिंदखेड, धुळे ग्रामीण, धुळे शहर, बागलाण (ST) या सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपने काँग्रेसवर आघाडी घेतली असताना ही आघाडी फक्त मालेगाव विधानसभा मतदारसंघात तुटली. मालेगावात भाजपला फक्त 4542 मते मिळाली, तर काँग्रेसला तब्बल 198869 मते मिळाली. मात्र हा फरक राहुल गांधींना “दिसला” नाही. किंवा दिसूनही तो त्यांनी सांगितला नाही.

पण म्हणून मतांच्या शिरजोरीतले राजकीय सत्य बाहेर यायचे राहिले नाही. तुषार गुप्ता यांनी राजदीप सरदेसाईंना प्रश्न विचारून हे सत्य बाहेर आणलेच. शिवाय त्यांनी राहुल गांधींना मालेगावचे स्पष्टीकरण देखील विचारले. अर्थातच राजदीप सरदेसाई यांनी राहुल गांधींनी तुषार गुप्तांच्या सवालांना उत्तरे दिली नाहीत, पण तरी सत्य लपून राहिले नाही.

खरं कारण काय?

राहुल गांधींना महादेवपुरा विधानसभा मतदारसंघातली मतदानाची “चोरी” दिसली, पण मालेगाव मधली मतदारांची शिरजोरी दिसली नाही. याचं नेमकं आणि खरं कारण काय??, याचा साधा शोध घेतला, तरी त्यातले राजकीय तथ्य समोर येईल. बंगलोर सेंट्रल लोकसभा मतदारसंघा मधल्या महादेवपुरा मतदारसंघाच्या रचनेत तो मतदारसंघ अर्थातच हिंदू बहुल असल्याचे उघड दिसले. त्या उलट धुळे लोकसभा मतदारसंघातल्या मालेगाव विधानसभा मतदारसंघ हा मुस्लिम बहुल आहे हे सत्य सगळ्या देशाला माहिती आहे. या राजकीय पार्श्वभूमीवर राहुल गांधींना महादेवपुरा मधली मतांची चोरी दिसली पण मालेगाव मधली मतदारांची शिरजोरी दिसली नसल्यास त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही.

कर्नाटकातले जात सर्वेक्षण

पण राहुल गांधींच्या या राजकीय रडगाण्याचा मुद्दा एवढ्या पर्यंतच मर्यादित राहिला नाही. कर्नाटकातल्या काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारने निवडणूक आयोगाच्या सध्याच्या कर्नाटकातल्या मतदार यादीनुसारच राज्यातले जात सर्वेक्षण करायचा निर्णय घेतला. ही माहिती राज्याचे मंत्री एच. आर. पाटील यांनी 7 ऑगस्टला पत्रकारांना दिली. पण मुळात राहुल गांधींचा कर्नाटकातल्या मतदार यादीवरच आक्षेप आहे तर त्या यादीनुसार केलेले जात सर्वेक्षण हे तरी कसे वैध धरायचे??, हा खरा सवाल आहे. पण या सवालाला राहुल गांधी किंवा सिद्धरामय्या यांनी उत्तर दिले नाही.

Karnataka caste census based on election commissions current voter list

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात