विशेष प्रतिनिधी
पुणे: पुण्यात मनसेचे माजी नगरसेवक किशोर शिंदे आणि मनपा आयुक्त नवल किशोर राम यांच्यात झालेला वाद आता चांगलाच टोकाला गेला आहे. बुधवारी आयुक्तांची बैठक चालू असताना शिंदे हे जबरदस्ती आत घुसले, आयुक्तांवर धावून आले, असा आरोप आयुक्तांनी केलाय. तर, तुमचं वर्तन गुंडाप्रमाणे आहे, असं आयुक्तांनी शिंदेंना सुनावलं असल्याचही बोललं जातंय. दुसरीकडे आयुक्त नवल किशोर राम हे शिंदेंना हिंदीत ‘तुम बाहर निकल जाओ’ असं म्हणाले. त्यामुळे या वादाला हिंदी मराठी वादाचीही किनार असल्याचं बोललं जातंय. Municipal Commissioner
मनसे कार्यकर्त्यांचे आंदोलन
वाद वाढल्यानंतर पुण्यातील मनसेचे अनेक नेते पालिकेत दाखल झाले, व त्याठिकाणी त्यांनी घडलेल्या प्रकाराविरोधात ठिय्या आंदोलन केलं. महापालिका आयुक्तांवर कारवाई झाली पाहिजे. तसेच त्यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल जाहीर माफी देखील मागावी अशी मागणी मनसेच्या नेत्यांनी केली. हा गोंधळ जवळपास २ तास चालू होता.
वादानंतर मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
या सगळ्या गोंधळानंतर महापालिकेत पोलिस दाखल झाले. त्यानंतर, शिंदे व त्यांच्यासोबत असणाऱ्या तिन्ही कार्यकर्त्यांना पोलिसांनी हाताला धरून बाहेर काढल्याचे व्हिडीओ देखील समोर आले. लगेचच पालिकेत पोलीस बंदोबस्त करण्यात आला, सगळे दरवाजे बंद करण्यात आले. इतकंच नाही तर, या सगळ्या प्रकारानंतर आयुक्तांनी शिंदे आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या इतर तीन कार्यकर्त्यांवरही सरकारी कामात अडथळा आणण्यामुळे गुन्हा दाखल केलाय. Municipal Commissioner
महाविकास आघाडीची मनसेला साथ
एकीकडे महापलिकेत झालेल्या घटनेचा निषेध म्हणून पालिकेतील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती बांधून पालिकेच्या आवारात काम बंद आंदोलन पुकारलं, दुसरीकडे मनसेला पाठींबा देण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्वच पक्ष मैदानात उतरल्याच दिसून येतंय. आघाडीतील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार), आणि शिवसेना (उध्दव ठाकरे) या तिन्ही मित्रपक्षाच्या नेत्यांनी महापालिकेसमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. अश्याप्रकारे मनसेसाठी किंवा मनसेसोबत आंदोलन करायची ही महाविकास आघाडीची ही पहिलीच वेळ आहे.
युतीच्या चर्चांना उधाण
महाराष्ट्रात हिंदी सक्तीचा निर्णय घेतल्यापासूनच मनसे आणि शिवसेना (उध्दव ठाकरे) एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अशातच महाविकास आघाडीने मनसेला दिलेला हा उघड पाठींबा या चर्चांची पुष्टी करतोय का? केवळ शिवसेनाच (उध्दव ठाकरे) नाही तर संपूर्ण महाविकास आघाडीने दर्शवलेला हा पाठींबा केवळ या आंदोलनापुरताचं सीमित आहे का? की आगामी महापालिका निवडणुकीमध्ये देखील ही साथ कायम राहील? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसचं, महाविकास आघाडी आणि मनसेच्या युतीमुळे येणाऱ्या महापलिका निवडणुकांमध्ये चित्र पालटण्याची शक्यता देखील व्यक्त केली जातेय.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App