Rohit Pawar : रोहित पवारांचा दावा- शिवसेनेच्या मंत्र्यांना इन्कम टॅक्सची नोटीस; स्वत: शिंदेंच्या कुटुंबातील सदस्यालाही ईडीची नोटीस

Rohit Pawar

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Rohit Pawar  एकनाथ शिंदेंच्या सर्व मंत्र्यांना आयकर विभागाची नोटीस गेली असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. एकनाथ शिंदेंच्या कुटुंबातील एका सदस्याला देखील ईडीची नोटीस गेलेली असल्याचेही त्यांनी सांगितले. ते आज छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यात सुरू असलेल्या पक्षप्रवेशांवरही संभावना व्यक्त केल्या.Rohit Pawar

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यानंतर रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना अनेक दावे केले.Rohit Pawar



नेमके काय म्हणाले रोहित पवार?

महायुतीमध्ये सध्या सर्व काही ऑल इज नॉट वेल सुरू आहे. एकनाथ शिंदेंच्या सर्व मंत्र्यांना इनकम टॅक्सच्या नोटीस गेलेल्या आहेत. स्वत: एकनाथ शिंदेंच्या परिवारातील एका व्यक्तीला सुद्धा ईडीची नोटीस गेलेली आहे. कदाचित संजय शिरसाट यांचा व्हिडिओ बघितल्यानंतर एकाकडेच एवढ्या बॅग असतील, तर बाकींच्याकडे सुद्धा असू शकतात, असे आयकर विभागाला वाटले असेल. त्यामुळे त्यांना नोटीस गेल्या असाव्यात, असे रोहित पवार म्हणाले. नोटीस आली नसेल, तर त्यांनी तसे सांगावे आणि आली असेल, तर कशाची आली? हे देखील त्यांनी सांगावे, असे आव्हान रोहित पवार यांनी केले.Rohit Pawar

भाजप शिंदेंच्या लोकांना टार्गेट करतोय

कल्याणमध्ये माजी भाजपचा एक आमदार जो आता अपक्ष लढला होता. कारण शिंदेंच्या उमेदवाराला तिथे संधी दिली होती. तो आता एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या बिल्डरविरोधात आंदोलनाला बसलेला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. पण अद्याप कारवाई झालेली नाही. भाजप प्लॅनिंग करून एकनाथ शिंदेंच्या आमदारांना, मंत्र्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना टार्गेट करत आहेत. त्यांच्याशी निगडीत असलेले व्यवसायांना देखील लक्ष्य केले जात आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

धनुष्यबाण ठाकरेंना मिळण्याची शक्यता

एकनाथ शिंदे कितीवेळ दिल्लीला गेले? मध्ये मध्ये ते साताऱ्याला त्यांच्या गावी जातात, का जातात? तर जेव्हा या तीन पक्षांमध्ये ऑल इज नॉट वेल असते तेव्हा ते जात असतात. सुप्रीम कोर्टात जी सुनावणी लागली, त्यात धनुष्यबाण हे चिन्ह उद्धव ठाकरेंना मिळण्याची शक्यता वाढलेली आहे. त्यांना धनुष्यबाण मिळणार असेल, तर घड्याळ आम्हाला मिळण्याची शक्यता आहे. हे जर झाले, तर धनुष्यबाण आणि घड्याळावर निवडूण आलेले जे पक्ष आहेत, त्यांच्या दोन पर्याय राहतात. पहिला म्हणजे सर्व आमदार घेऊन भाजपमध्ये विलीन व्हायचे. दुसरा जेवढे आमदार आहेत, त्या ठिकाणी पुन्हा निवडणूक होईल.

Rohit Pawar Claims: Shiv Sena Ministers Receive Income Tax Notices

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात