विशेष प्रतिनिधी
अमरावती : भाजपच्या फायरब्रँड नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवित धमकी देण्यात आली असून, या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये अत्यंत अश्लील आणि जातीवाचक भाषेत नवनीत राणा यांच्याविरोधात वक्तव्य करण्यात आले असून, त्यांना गळा कापण्याची धमकीही देण्यात आली आहे. Navneet Rana
या व्हिडीओत संबंधित व्यक्तीने नवनीत राणा यांना “अंधभक्त” म्हणत अश्लील भाषेत शिवीगाळ केली असून, “या देशात अंधभक्तांची जागा नाही, आणि यावेळी थेट खून केला जाईल”, असा धमकीवजा इशारा दिला आहे. तसेच हिंदू, मुस्लिम, सिख, ख्रिश्चन हे सर्व भाऊ आहेत, जातीयवाद पसरवण्याचा प्रयत्न करू नकोस, अन्यथा परिणाम गंभीर असतील असेही त्या व्यक्तीने म्हटले आहे.
या प्रकरणी नवनीत राणा यांचे स्वीय सहाय्यक विनोद गुहे यांनी अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे.
गेल्या काही वर्षांत नवनीत राणा यांना पुनःपुन्हा धमक्या देण्यात आल्या असून, यापूर्वीही त्यांच्यावर समाजमाध्यमांद्वारे अशाच प्रकारचे हल्ले करण्यात आले होते. परंतु यंदा दिलेली धमकी थेट हत्येची असून, त्यामुळे याचे गांभीर्य अधिक वाढले आहे.
व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, राणा अमरावली जिले की पहले पतपर रहने वाली एक ××××,बहोत बोल रही तु आ.
अरे यह हिंदुस्थान मुगलो का नही है तेरे जैसे अंध भक्त का है, अंध भक्त की ×××××× करन वाली ××××.
नवनित राणा यह हिदुस्थान सब का है, हिंदू, मुस्लिम, सिख, इसाइ सब है अपने भाई.
तू कभी जातीवादी की बाता करेगी तो हमारे सें बुरा कोई नही होगा.
इसके पहले बहोत बार मार खा चुकी तुने, इस बार छोडे नही जायेगा डायरेक्ट कत्ल कर जायेंगा हा.
अकलमद को इशारा मस्ती नही बापसे, देख लेना मियॉ भाई अपने हिसाब से,बहोत बुरा हो जायेगा..
परपर भामेगी तु ××××× नवनित राणा..”
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App