Hard Facts : ट्रम्पशी पंगा झाला म्हणून अमेरिकेशी सगळे संबंध संपलेले नाहीत, भारत चीनच्या कह्यात देखील गेलेला नाही!!

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर संतापून 50 % टेरिफ लादला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्रम्प यांचे नाव न घेता भारतीय शेतकऱ्यांचे हित जपणारच, असे सांगून परखड प्रत्युत्तर दिले म्हणून अमेरिकेशी सगळे संबंध संपले, असे अजिबात झालेले नाही. ट्रम्पशी पंगा झाला, म्हणून भारताचे अमेरिकेशी सगळे संबंध संपलेले नाहीत. त्याचबरोबर भारत चीनच्या कह्यात देखील गेलेला नाही. आंतरराष्ट्रीय राजकारणातील ही गुंतागुंतीची वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे.

मूळात डोनाल्ड ट्रम्प भारतावर चिडले कारण भारत आत्मनिर्भरतेच्या दिशेने गेला. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारत पाकिस्तान मध्ये अमेरिकेच्या अण्वस्त्रांना धक्का लागेल इथपर्यंत हल्ले करत गेला. भारताने स्वतःचे स्वतंत्र राजनैतिक व्यापारी आणि सामरिक धोरण ठेवले. त्यामुळे जुनीच वसाहतवादी मानसिकता रुजलेले डोनाल्ड ट्रम्प भारतावर चिडले.

– मॅकडोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांचे युद्ध थांबविले याचे श्रेय 36 वेळा घेतले पण पंतप्रधान मोदींनी एकदाही त्याला दुजोरा दिला नाही. भारताच्या या वर्तणुकीला राजेनैतिक पातळीवरून प्रगल्भतेने स्वीकारण्याच्या ऐवजी डोनाल्ड ट्रम्प यांनी थयथयाट केला, जो सर्वसाधारणपणे आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या राजनैतिक संबंधांच्या भाषेमध्ये बिलकुलच अपेक्षित नव्हता. डोनाल्ड ट्रम्प यांनी राजनैतिक सभ्यता ओलांडून संजय राऊत यांच्यासारखी वर्तणूक ठेवली. त्यामुळे ते अमेरिकेतही हास्यास्पद बनले “डोनाल्ड ट्रम्प” यांचे नाव लोकांनी “मॅकडोनाल्ड ट्रम्प” ठेवले. याला कारणीभूत अमेरिकन किंवा बाकीच्या देशांमध्ये लोक ठरले नाहीत तर स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांची लघुदृष्टीची राजकीय वर्तणूक ठरली. भारतातले मोठे बिल्डर हिरानंदानी यांनी तर डोनाल्ड ट्रम्प यांना “शॉर्ट टर्म बिझनेसमन” म्हणून घेतले. ट्रम्प यांची एवढी बेइज्जती अन्य कुणी केले नव्हती.

– सामरिक संबंध संपलेले नाहीत

एवढे सगळे झाले तरी भारत आणि अमेरिका यांच्यातले राजनैतिक, व्यापारी आणि सामरिक संबंध संपलेले नाहीत. ते संपण्याची शक्यता नाही. कारण अंतराळ क्षेत्र, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर, फार्मासिटिकल या क्षेत्रांमध्ये संबंध आणि करार जसेच्या तसे कायम आहेत. नासा आणि इस्रो यांच्यातला करार कायम आहे. तिथले कामही कायम सुरू राहिले आहे. भारताने अमेरिकेची f35 विमाने नाकारली म्हणून अन्य संरक्षण विषयक करार संपुष्टात आलेला नाही. तो एकतर्फी संपविण्याची ट्रम्प यांच्याकडे कायदेशीर ताकदही नाही.



– संबंधांमधली प्रगल्भता

सध्याच्या युगात आंतरराष्ट्रीय संबंध हे कप्प्यांमध्ये ठेवून बघितले जातात वादग्रस्त विषय विशिष्ट कप्प्यांमध्ये ठेवून अन्य क्षेत्रांमध्ये संबंध वाढविणे हे सर्वसाधारण आंतरराष्ट्रीय धोरणाचे सूत्र विकसित देश पाळतात. याला भारतही अपवाद नाही. म्हणूनच चीन सारख्या देशाशी सीमावाद असताना देखील भारत वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये चीनशी सहयोग करतो आणि चीन देखील भारताशी सहयोग करतो. सीमा वादावर संघर्ष करणारे भारत आणि चीन आपले आंतरराष्ट्रीय संबंध प्रगल्भतेने चालवतात नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग हे डोनाल्ड ट्रम्प किंवा संजय राऊत यांच्यासारखे रोज येऊन पत्रकारांबरोबर धोरणात्मक चर्चा करत नाहीत. आंतरराष्ट्रीय संबंध मधली गुंतागुंत आणि गांभीर्य भारत आणि चीन पाळतात.

– विचारवंतांच्या उसळ्या

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताशी पंगा घेतल्यानंतर भारतातले काही स्वयंघोषित youtubes आणि विचारवंत उसळ्या मारून मोदींची बाजू घेऊन किंवा मोदींच्या विरोधात बोलतायेत. डोनाल्ड ट्रम्प यांना मोदी कसा धडा शिकवतात किंवा ट्रम्प यांच्यापुढे मोदी कसे झुकलेत, याची वर्णने करतायेत, तसे अजिबात झालेले नाही. होताना दिसत नाही आणि होण्याची शक्यता नाही. कारण डोनाल्ड ट्रम्प यांना धडा शिकवणे हे सोपे नाही. त्याचबरोबर डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींना वाकविणे हे देखील बिलकुल सोपे नाही. कारण भारत आणि अमेरिका यांच्यातल्या संबंधांची गुंतागुंत ही रोजच्या पत्रकार परिषदांच्या बौद्धिक चोदमपट्टीच्या पलीकडची आहे. त्यामध्ये कोट्यावधी डॉलर्सची गुंतवणूक झालेली आहे, ती गुंतवणूक कुणाच्याही बडबडीने संपणारी नाही किंवा वाढणारी देखील नाही.

– Hard Facts

डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी पंगा घेतल्यानंतर भारताने चीन आणि रशिया यांच्याबरोबरचे संबंध वाढविले आणि या तीन देशांनी येऊन ट्रम्प यांच्यावर मात केली असेही चित्र रंगविले जात आहे, जे खोटे आहे. याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण असे की अमेरिकेची अर्थव्यवस्था आणि अन्य तीन देशांची अर्थव्यवस्था यांच्यात जमीन – अस्मानाचा फरक आहे. हे चारही देश एकमेकांचे एकाच वेळी सहकारी, पण जास्त स्पर्धक आहेत. या प्रत्येक देशाची ताकद आणि कमकुवत बाजू अलग – अलग आहेत. हे चारही देश अनेक गोष्टींसाठी एकमेकांवर अवलंबून आहेत. किंबहुना एकमेकांवरचे अवलंबित्व आणि एकमेकांशी स्पर्धा हीच या चारही देशांच्या आंतरराष्ट्रीय संबंध मधली सगळ्यात मोठी गुंतागुंत आहे. जी youtubers आणि विचारवंत यांच्या डोक्याच्या पलीकडची आहे.

– चीनशी हात राखून संबंध

ट्रम्प यांच्याशी पंगा घेतल्यामुळे भारत चीनच्या जवळ गेला किंबहुना तो चीनच्या कह्यात गेला असेही चित्र रंगविले जात आहे, जे सर्वस्वी खोटे आहे. सध्याचा भारत हा राजनैतिक अनुभवातून पोळलेला आणि तावून-सुलाखून निघालेला भारत आहे. चीनशी हाताचे अंतर राखून संबंध कसे वाढवायचे, त्यासाठी कोणती हत्यारे आजमावायची हे भारतीय राजनीतिज्ञांना नक्की समजले आहे. त्यामुळे भारतात आता राज्यकर्ते कुणीही असोत, भारत चीनच्या कह्यात जाण्याची शक्यता नाही. बाकी त्या देशाबरोबरचे संबंधांमध्ये चढ उतार होत राहतील, त्यापलीकडे काही घडण्याची शक्यता नाही.

India keeping international relations with USA and China on hard facts

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात